कर्जाला कंटाळून प्रसिद्ध तेलुगू कोरिओग्राफरची आत्महत्या

कर्जाला कंटाळून प्रसिद्ध तेलुगू कोरिओग्राफरची आत्महत्या

Telugu Choreographer Chaitanya suicide: तेलुगू कोरिओग्राफर चैतन्यने रविवारी, 30 एप्रिल रोजी आत्महत्या केली आहे. चैतन्यने कर्जाच्या ओझ्यामुळे निराश होऊन आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. कोरिओग्राफर चैतन्य हा लोकप्रिय तेलुगू डान्स शो धीमध्ये दिसला होता.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी चैतन्यने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओही शेअर केला होता. व्हिडीओमध्ये त्याने खुलासा केला आहे की तो कर्ज फेडू शकत नाही. कर्जाचा दबाव सहन करु शकत नसल्याचे त्याने सांगितले आहे.

व्हिडिओमध्ये चैतन्य म्हणाला, “माझी आई, वडील आणि बहिणीने माझी खूप काळजी घेतली आणि मला कधीही कोणतीही अडचण येऊ दिली नाही. मी माझ्या सर्व मित्रांची मनापासून माफी मागतो. मी अनेकांना नाराज केले आहे आणि मी सर्वांची माफी मागतो. पैशाच्या बाबतीत मी माझा चांगुलपणा गमावला. केवळ कर्ज घेण्याची क्षमता असून चालत नाही तर ते फेडण्याची क्षमताही असली पाहिजे. पण मी ते करू शकलो नाही. सध्या मी नेल्लोरमध्ये आहे आणि हा माझा शेवटचा दिवस आहे. मी माझ्या कर्जाचा त्रास सहन करू शकत नाही.”

…म्हणून शरद पवार देवेंद्र फडणवीसांचा राग करतात; सदाभाऊंचा गौप्यस्फोट

त्याचवेळी चैतन्यच्या मृत्यूची बातमी कळताच अनेक चाहत्यांना धक्का बसला. कोरियोग्राफरला अखेरचा श्रध्दांजली वाहण्यासाठी चाहते ट्विटरवर पोस्ट करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube