FilmFare अवॉर्ड्समध्ये ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाला एकही अवॉर्ड न मिळाल्याने अनुपम खेर यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत
Filmfare Awards 2023 : 68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सबद्दल (Filmfare Awards 2023) चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता सुरूवातीपासूनच पाहायला मिळत होती. विशेष म्हणजे बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात भाईजान याने या फिल्मफेअर अवॉर्ड्सला (Filmfare Awards) होस्ट केले आहे. फिल्मफेअर अवॉर्ड्सचे नामांकन सर्वात अगोदर जाहीर करण्यात आले होते.
मात्र, 68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सवर विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी बहिष्कार घातला होता. या संदर्भातील एक पोस्ट विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी सोशल मीडियावर शेअर केली. मुंबईमधील जियो गार्डनमध्ये फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 पार पडला आहे. यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कारात ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘बधाई दो’ या दोन सिनेमांचा जलवा चाहत्यांना बघायला मिळाला.
View this post on Instagram
राजकुमार रावला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या फिल्मफेअर पुरस्काराची उत्तम मानकरी ठरली आहे. गंगुबाई काठियावाडी सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमासह १० पुरस्कार मिळाले आहेत. तर हर्षवर्धन कुलकर्णीच्या ‘बधाई दो’ने क्रिटीक्स अवॉर्ड कॅटेगरीमध्ये सर्वाधिक ६ पुरस्कार जिंकले आहेत. अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र: भाग-१ शिवा’ या सिनेमालाही ४ कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाले आहेत.
#TheKashmirFiles pic.twitter.com/npPHwLkLHG
— Anupam Kher (@AnupamPKher) April 28, 2023
परंतु, विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) सिनेमाला यंदाच्या फिल्मफेअरमध्ये एकही पुरस्कार दिला नाही. फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा झाल्यावर प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ‘इज्जत ही महागडी गोष्ट आहे. यामुळे ती देण्याची अपेक्षा छोट्या लोकांकडून ठेवू नये, असं अनुपम खेर (Anupam Kher post) यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.
Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती
अनुमप खेर यांच्या या पोस्टचा संबंध फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याशी जोडला जात असल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमाला फिल्मफेअर पुरस्कार २०२३ मध्ये ७ श्रेणींत नामांकन मिळाले होते. काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित नव्हते. एक दिवस अगोदरच त्यांनी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार नसल्याचे सांगण्यात आले होते. अग्निहोत्रींनी फिल्मफेअर पुरस्कारांना नैतिकदृष्ट्या स्वीकारण्यास योग्य नसल्याचे या ट्वीटमध्ये त्यांनी सांगितले होते.