Gauahar Khan: अभिनेत्री गौहर खानच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन; पोस्ट करत म्हणाली ‘आनंदाचा खरा अर्थ…’

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 12T104655.692

Gauahar Khan: ‘बिग बॉस ७’ची (Big Boss 7) विजेती आणि बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान ही गेल्या काही दिवसांपासून सतत जोरदार चर्चेत आहे. (Gauahar Khan Zaid Darbar ) गौहर खान आणि तिचा पती जैद दरबार यांनी त्यांच्या पहिल्या बेबीचे स्वागत केले आहे. गौहर खानने बुधवारी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. (ENTERTAINMENT) त्यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gauahar Khan (@gauaharkhan)


गौहर खान आणि जैद दरबारने नुकतंच सोशल मीडियावर (Social media) ही पोस्ट शेअर केली आहे. (BOLLYWOOD) तिने तिला मुलगा झाल्याची खुशखबर दिली आहे. “आम्हाला मुलगा झाला आहे. सलाम ऊ अलैकुम, या सुंदर जगात तुझे स्वागत. १० मे २०२३ ला आम्हाला आमच्या आनंदाचा खरा अर्थ काय हे समजले आहे. आम्हाला मुलगा झाला आहे. तुमचे प्रेम आणि प्रार्थनेबद्दल मनापासून आभार.

कृतज्ञ आणि नवीन पालक झैद आणि गौहर, असे तिने यामध्ये उल्लेख केला आहे. गौहरच्या या पोस्टवर अनेकांनी जोरदार कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील तिला कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ‘अभिनंदन, तुला आणि बाळाला खूप खूप प्रेम’, अशी कमेंट सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे.

Nawazuddin Siddiqui: चित्रपटांतील भूमिकेवर नवाजुद्दीन सिद्दिकीने मौन सोडलं; म्हणाला, ‘आता फक्त…’

दरम्यान गौहर खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपट आणि सीरिजमध्ये काम केले आहे. ती तिच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यासाठी कायम चर्चेत असते. गौहर खान नुकतीच नेटफ्लिक्सवर ‘१४ फेरे की कहानी’ या सिनेमामध्ये महत्वाची भूमिका साकारली होती.

Tags

follow us