‘सिर्रा’ नंतर गुरु रंधावाचा नवा धमाका! ‘अजूल’ गाण्यात नवोदित अंशिका पांडेसोबत केली जबरदस्त एन्ट्री

‘सिर्रा’ नंतर गुरु रंधावाचा नवा धमाका! ‘अजूल’ गाण्यात नवोदित अंशिका पांडेसोबत केली जबरदस्त एन्ट्री

Guru Randhawa Launched Latest Song Azul : पंजाबी पॉपचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे गुरु रंधावा (Guru Randhawa) ‘सिर्रा’ गाण्यानंतर पुन्हा एकदा नवीन चेहरा घेऊन चाहत्यांसमोर हजर झाले आहेत. त्यांचा नवीन डान्स नंबर ‘अजूल’ नुकताच रिलीज झालाय. यामध्ये त्यांनी अंशिका पांडे (Anshika Pandey) हिला मोठ्या स्क्रीनवर झळकण्याची संधी मिळाली आहे. ‘अजूल’ हे गाणं (Song Azul) जुन्या काळाच्या ग्लॅमरस अंदाजाला पंजाबी बीट्सच्या जबरदस्त मिक्ससह सादर करतं. गुरु रंधावाचा स्वाभाविक पंजाबी टच, त्यांच्या आवाजातील ताकद, आणि अंशिकाच्या उत्साही डान्स मूव्ह्जमुळे ( Entertainment News) हे गाणं एक परफेक्ट व्हायब्रंट डान्स नंबर ठरतंय.

सोशल मीडियातून सुरू झालेली कहाणी

गुरु रंधावा यांनी अंशिकाला पाहिलं तेव्हा तिनं ‘कतल’ आणि ‘सिर्रा’ या गाण्यांवर डान्स करतानाचे व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या डान्समधील सहजता आणि एनर्जीने गुरुंचं लक्ष वेधून घेतलं. त्यांनी तिला कमेंट करत एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यातूनच ‘Azul’ गाण्याचा प्रवास सुरू झाला.

Bihar : वोटर लिस्टमधून वगळलेल्या 65 लाख मतदारांची माहिती सादर करा; SC चा निवडणूक आयोगाला आदेश

आकर्षक कोरिओग्राफी, दमदार बीट्स

गुरु रंधावा हे केवळ हिट गाण्यांसाठी नाही, तर नवीन कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी देखील ओळखले जातात. सिर्रामध्ये देखील त्यांनी सोशल मीडियातून नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. आता अजूलमध्ये अंशिका पांडे हिला संधी देत, त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की ते केवळ कलाकार नव्हे, तर एक संगीत क्षेत्रातील प्रोत्साहकही आहेत.
या गाण्याची कोरिओग्राफी यश यांनी केली आहे. सोपी, पण स्टायलिश डान्स स्टेप्स हे या गाण्याचे मुख्य वैशिष्ट्य असून, सोशल मीडियावर अजूलचा डान्स ट्रेंड लवकरच व्हायरल होण्याची शक्यता आहे. गुरु रंधावा यांचे गाणे आले, की त्यावर रील्स येणारच – ही चाहत्यांमध्ये असलेली हमखास अपेक्षा अजूल पूर्ण करताना दिसत आहे .

…तेव्हापासून फडणवीस मनातून उतरले, त्यांच्यामुळे मोदी सरकारचाही बट्ट्याबोळ; जरांगे आक्रमक

म्युझिक चार्टवर कायम आघाडीवर

गुरु रंधावा सध्या सन ऑफ सरदार 2 मधील द पो पो सॉंग, तसेच त्यांच्या इंडिपेंडेंट अल्बममधील कतल, सिर्रा आणि किथे वस द या गाण्यांमुळे सतत चर्चेत आहेत. अजूलने या नव्या सिंगलने त्यांच्या यशाच्या यादीत आणखी एक स्टार गाण्याची भर टाकली आहे. हे गाणं हे दाखवून देतं की, योग्य वेळ आणि योग्य व्यासपीठ मिळालं, तर नवोदित कलाकारही प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करू शकतात. अंशिका पांडे हिची ही एन्ट्री केवळ एका डान्स व्हिडिओमधून सुरु होऊन एका मोठ्या गाण्यापर्यंत पोहोचली. हे अनेक नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायक ठरू शकतं.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube