Happy Birthday Anil Kapoor : तरुणांनाही लाजवणारा फिटनेस ते झकास व्यक्तीमत्त्व : अनिल कपूर….

Happy Birthday Anil Kapoor : तरुणांनाही लाजवणारा फिटनेस ते झकास व्यक्तीमत्त्व : अनिल कपूर….

Happy Birthday Anil Kapoor : वयाची 60 ओलांडल्या नंतरही तरुणांना लाजवेल असा फिटनेस असणारे अभिनेते म्हणजे अनिल कपूर. (Anil Kapoor) त्यांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मग राम लखन मधील ठग पोलिस वाला असो ते वेलकम बॅक या चित्रपटातील कॉमेडी किंवा आता अलीकडच्या अ‍ॅनिमल सारख्या चित्रपटातील सिरीअस रोल असो. त्यांच्या अभिनयाची कायम जोरदार चर्चा होत असते. आज 24 डिसेंबर रोजी अनिल कपूर यांचा वाढदिवस आहे.

अनिल कपूरला यांना 1984 मध्ये यश चोप्रा यांच्या मशाल या चित्रपटातून ओळख मिळाली. पण खऱ्या अर्थाने अनिल कपूर समस्त चित्रपट सष्टीच्या ओळखीस आले ते म्हणजे शेखर कपूर यांच्या मिस्टर इंडिया या चित्रपटामधून. याच चित्रपटानंतर अनिल कपूर रातोरात स्टार झाले. असं बोलायला काही हरकत नाही. यानंतर कधीच अनिल कपूर यांनी मागे वळून बघितले नाही. जुदाई, तेजाब, ताल, नायक यांसारखे अनेक सक्सेसफुल चित्रपटांची नावे अनिल कपूर या कलाकाराच्या खात्यामध्ये लिहिली गेली आहेत. बॉलिवूड शिवाय अनिल कपूर यांनी स्लमडॉग मिलेनियर या ब्रिटिश चित्रपटातही काम केले आहे. त्याचसोबत टॉम क्रूस या हॉलिवुड कलाकाराच्या मिशन इम्पॉसिबल या चित्रपटामध्ये ही काम केले आहे.

अनिल कपूर यांना चित्रपट सृष्टीमध्ये येऊन आता सुमारे 4 दशकांचा कालावधी लोटला आहे. यादरम्यान त्यांनी ऍक्शन, रोमान्स, कॉमेडीपासून संवेदनशील भूमिका निभावल्या आणि सिनेसृष्टीत आपले नाव कमावले आहे. अनिल कपूरची सर्वाधिक माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी बरोबरील जोडी हिट मानली जाते. अनिल कपूरने यांनी अनेक चित्रपट केले. त्याच चित्रपटांमधील अनेक डायलॉग आज देखील प्रेक्षकांच्या तोंडवर आहेत. त्याचपैकी गाजलेले काही खास डायलॉग…

– मस्का है मस्का….एक दम झकास (युद्ध)

-पोलिस की गोली मैं इतना लोहा नही, एक बार ठोक दि ना…तो जिंदगी भर तेरे खून मैं आयर्न की कमी नही होगी (शूटआऊट ऍट वडाळा)

-आपकी शराफत के चक्कर में मैं कायदे में हूँ, वरना अब तक मेरे खुद के दो चार अल-क़ायदे होते (वेलकम बॅक)

असा आहे हिंदी चित्रपटसृष्टीमधील या दमदार कलाकाराचा जीवनप्रवास, आज देखील नवीन अभिनेत्यांना लाजवेल अशी शरीरयष्टी, त्यांना लाजवेल असा नाविन्य जोश अभिनय आणि समाजाला घेऊन एक कर्तव्य निष्ठ नागरिक, याच सगळ्या कलागुणांमुळे आज सुद्धा अनिल कपूर यांचं नाणं खणखणत आहे. अशाच सदाबहार आणि चिरतरुण राहणाऱ्या झकास कलाकाराला लेट्सअप मराठी कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube