आयुष्य आणि नात्यांनी आणलेल्या छोट्या-छोट्या आश्चर्यांचा अनुभव घ्या; अभिनेता उमेश कामत झाला व्यक्त !

Hey Kay Navin ?-नाती ही आयुष्याप्रमाणेच काळानुसार विविध टप्प्यांतून जातात. माणसं जसजशी वयानुसार पुढे जातात आणि आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांतून प्रवास करतात,

  • Written By: Published:
Umesh Kamat

Hey Kay Navin ? : ‘हे काय नवीन ? (Hey Kay Navin ?) हा मराठी ZEE5 वरील शो आयुष्यातील मोठ्या टप्प्यांनंतर नात्यांमध्ये काय बदल होतात याचा हृदयस्पर्शी आणि वास्तवदर्शी आढावा घेतो. उबदारपणा, विनोद आणि वास्तव यांचा सुंदर मिलाफ करत, हा शो दीर्घकालीन नात्यांमधील न बोलल्या जाणाऱ्या चिंतेचा, नव्याने सुरुवात करण्यासाठी लागणाऱ्या धैर्याचा आणि सोबतीच्या शांत बळाचा वेध घेतो. संघर्ष, आत्मपरीक्षण आणि पुन्हा जुळणाऱ्या नात्यांच्या क्षणांतून ही मालिका दाखवते की जेव्हा जोडीदार ‘कम्फर्ट’पेक्षा ‘ग्रोथ’ची निवड करतात, तेव्हा प्रेम कसे बदलत जाते.

नाती ही आयुष्याप्रमाणेच काळानुसार विविध टप्प्यांतून जातात. माणसं जसजशी वयानुसार पुढे जातात आणि आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांतून प्रवास करतात, तसतसे त्यांचे प्राधान्यक्रम, दृष्टिकोन आणि अपेक्षा नैसर्गिकरित्या बदलतात. नात्याच्या सुरुवातीच्या काळात जोडीदार एकमेकांकडून जे अपेक्षित ठेवतात, ते पुढे जबाबदाऱ्या, अनुभव आणि वैयक्तिक वाढ यामुळे बदलत जाते. काळानुसार, नाती स्थिर नसून सतत बदलणारी असतात, हे समजून घेत अभिनेता उमेश कामत प्रिया बापट जोडी त्या बदलांशी जुळवून घेतात.

यावर अधिक भाष्य करत उमेश कामत सांगतो, “नात्यांमध्येही आयुष्यासारखे वेगवेगळे टप्पे असतात. काळ जसजसा पुढे जातो, तसतसे माणसं बदलतात, त्यांचे प्राधान्यक्रम बदलतात आणि नैसर्गिकरित्या एकमेकांकडून असलेल्या अपेक्षाही बदलतात. आयुष्यातील एका टप्प्यावर आपण नात्याकडून जे काही अपेक्षित ठेवतो, ते पुढे तसेच राहीलच असे नाही, कारण अनुभवांमुळे प्रेम, सोबत आणि आयुष्याबद्दलचा आपला दृष्टिकोन सतत बदलत राहतो. आयुष्य आणि नात्यांनी आणलेल्या छोट्या-छोट्या आश्चर्यांचा अनुभव घ्या ‘हे के नवीन?’ मध्ये, आता फक्त मराठी ZEE5 वर बघायला विसरू नका !

follow us