विकेंडला सैयाराचं तूफान! बॉक्सऑफिसवर धुमाकुळ घालत केली बक्कळ कमाई

विकेंडला सैयाराचं तूफान! बॉक्सऑफिसवर धुमाकुळ घालत केली बक्कळ कमाई

Hindi Film Saiyaara Box Office Collection on Weekend : यशराज फिल्म्स आणि दिग्दर्शक मोहित सूरी (Mohit Suri) यांचा बहुचर्चित प्रेमकथानक चित्रपट ‘सैयारा’ (Saiyara) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अहान पांडे (Ahan Pandey) आणि अनीत पड्डा (Aneet Padda) यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. केवळ कथा आणि अभिनयच नव्हे, तर संगीत क्षेत्रातही ‘सैयारा’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट गाण्यांचा हा अल्बम समजला जात आहे.

अपघातानंतर स्विफ्ट चालकांकडून मर्सिडीज गाडीची तोडफोड, आठ वर्षाच्या मुलालाही नेलं उचलून…

या अल्बममधील गाणी: फहीम-अरसलान यांचे ‘सैयारा टायटल ट्रॅक’ जो आधीच ब्लॉकबस्टर ठरला आहे,जुबिन नौटियाल यांचे ‘बर्बाद’, विशाल मिश्रा यांचे ‘तुम हो तो’, सचेत-परंपरा यांचे ‘हमसफर’,अरिजीत सिंग आणि मिथुन यांचे ‘धुन’, श्रेया घोषाल यांचे ‘सैयारा रिप्राइज’,व शिल्पा राव यांचे ‘बर्बाद रिप्राइझ’ ही सर्व गाणी सध्या संगीत चार्टवर गाजत आहेत.‘सैयारा’ 18 जुलै 2025 रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामार्फत वायआरएफने आपल्या पुढील पिढीतील कलाकारांना आहान पांडे आणि अनीत पड्डा प्रेक्षकांसमोर सादर केलं आहे.

तो व्हिडिओ खोटाच, मी त्यांच्याच मागं बसलो होतो; मंत्री प्रताप सरनाई यांच्याकडून कोकाटेंची पाठराखण

दरम्यान या चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी आणि विकेंटला बक्कळ कमाई केली आहे. YRF आणि मोहित सुरी यांच्या सैयारा या चित्रपटाने भारतात 48.25 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने अहान पांडे आणि अनित पड्डा यांना एका रात्रीत स्टार आणि संपूर्ण देशाचे लाडके बनवले आहे. तर चित्रपटाच्या तीन दिवसांच्या आकडेवारीबद्दल सांगायचे झाले तर शुक्रवारी – ₹ 22 कोटी, शनिवारी – ₹ 26.25 कोटी, एकूण – ₹ 48.25 कोटी. त्यामुळे आजच्या आकडेवारीने चित्रपट 70 कोटींच्या पुढे जाईल एवढं नक्की.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नाव ‘सुवर्णाक्षरांनी लिहिणार’ ; स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं मोठं विधान

प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षा असलेल्या सैयारा (Saiyara) या प्रेमकथानक चित्रपटामुळे यशराज फिल्म्स (Yash Raj Films) आणि मोहित सूरी (Mohit Suri) हे दोघं पहिल्यांदाच एकत्र आले आहेत जे आपल्या काळातील सदाबहार प्रेमकथांचा आत्मा जपणारे आहेत. सैयारा आजच्या पिढीतील सर्वाधिक अपेक्षित प्रेम कथांमध्ये गणली जाते. या चित्रपटाच्या संगीत अल्बमने वर्षातील सर्वोत्तम अल्बमचा दर्जा मिळवला आहे. फहीम-अर्सलान यांचं शीर्षकगीत सैयारा (Saiyara), जुबिन नौटियालचं बर्बाद, विशाल मिश्राचं तुम हो तो, सचेत-परंपराचं हमसफर आणि आता अरिजीत सिंह व मिथून यांचं धुनहे सर्वच गाणं संगीत चार्ट्सवर धुमाकूळ घालत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube