Pathan : सर्वांत कमी दिवसात 250 कोटी क्लबमध्ये सामील होणारा हिंदी चित्रपट
मुंबई : शाहरुख खान (Shah Rukh Khan) स्टारर चित्र ‘पठान’ ची क्रेज प्रेक्षकांमध्ये प्रचंड आहे. देशातच नाही तर विदेशामध्येही ‘पठान’ धुमाकुळ घालत आहे. या चित्रपटाने बक्कळ कमाईहीकेली आहे. रिलीच झाल्याच्या 7 व्याचं दिवशी हा चित्रपट 250 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. त्यामुळे ‘पठान’ हा चित्रपट सर्वात कमी दिवसांत 250 कोटी क्लबमध्ये सामील होणारा चित्रपट ठरला आहे.
त्याचबरोबर शाहरुख खानच्या या चित्रपटाने बाहुबली 2: द कन्क्लूजन (हिंदी व्हर्जन) चे रिकॉर्ड ब्रेक करत 300 कोटींचा आकडा पार करणारा सर्वांत फास्ट हिंदी चित्रपट ठरला आहे. बाहुबली 2: द कन्क्लूजन या चित्रपटाच्या 2017 च्या हिंदी व्हर्जनने 300 कोटींचा आकडा 10 दिवसांत पार केला आहे.
त्याचबरोबर पठानने दुसऱ्या काही चित्रपटांचे केजीएफ : चॅप्टर 2 (2022) चे हिंदी व्हर्जनने 11 दिवसांत 300 कोटींपर्यंत पोहचला होता. तर आमिर खानचा दंगल (2016) 11 दिवसांत 300 कोटींपर्यंत पोहचला होता. संजू (2018) आणि टाइगर ज़िंदा है (2017) या 300 कोटींचा आकडा 10 दिवसांत पार करण्यासाठी 11 दिवस लागले होते. तर आमिर खानचा पीके (2014) ऋतिक रोशनचा वॉर (2019) 17 आणि 19 दिवसांत 300 कोटींपर्यंत पोहचला होता.