आमी डाकिनीच्या सेटवर हितेशचा फिटनेस मंत्र, सेटवर वेळ काढून चालवतात सायकल

Hitesh Bhardwaj हे 'आमी डाकिनी' मध्ये आयानची भूमिका साकारतात. ते सेटवर रोज सायकल चालवून आपल्या फिटनेसकडे लक्ष देतात.

Aami Dakini

Hitesh’s fitness mantra on the sets of Aami Dakini, he takes time off from the sets to ride a bicycle : शूटिंगचं काम आणि स्वतःच्या आरोग्याचं संतुलन राखणं सोपं नसतं, पण अभिनेता हितेश भारद्वाजहे दाखवून देत आहेत की थोडंसं शिस्तबद्ध जीवन आणि सायकलिंग यामुळे हे शक्य आहे. सोनी टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘आमी डाकिनी’ मध्ये आयानची भूमिका साकारणारे हितेश सेटवर रोज सायकल चालवून आपल्या फिटनेसकडे लक्ष देतात.

चंद्राबाबूंच्या पारड्यात आणखी एक पद; पक्षातील जेष्ठ नेत्याची राज्यपालपदी नियुक्ती

कठीण शूटिंग शेड्यूल आणि आव्हानात्मक सीन असूनही, हितेश सेटवर वेळ काढून सायकल चालवतात, ज्यामुळे त्यांना दिवसभर सक्रिय आणि ताजेतवाने वाटते. आपल्या फिटनेस रूटीनबद्दल हितेश म्हणतात, “माझ्या मते, आयुष्य कितीही व्यस्त असो, शारीरिक हालचाल आवश्यकच आहे. सायकल चालवल्यामुळे माझं मन शांत राहतं आणि दीर्घ शूटिंग दिवशी देखील ऊर्जा टिकून राहते. ही माझी स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवण्याची व फोकस टिकवण्याची पद्धत आहे.”

आम्ही बिना हुंड्याचं भाजपसोबत लग्न केलय; अखेर माजी आमदार संजय जगतापांचा प्रवेश ठरला

शूटिंगदरम्यान हितेश अनेकदा सीनच्या मधे क्रू आणि सहकलाकारांच्या नजरेस सायकल चालवताना पडतात. हे दृश्य सर्वांसाठी प्रेरणादायक आणि आनंददायक असतं. जसं ‘आमी डाकिनी’ प्रेक्षकांच्या मनात घर करतंय, तसं हितेश यांचा कामावरील आणि आरोग्यावरील समर्पणासाठी त्यांचं अधिक कौतुक केलं जातंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube