सावधान! 2050 पर्यंत ‘हा’ आजार अडीच कोटी लोकांना ग्रासणार; औषध नाही पण सावध तर व्हा!

सावधान! 2050 पर्यंत ‘हा’ आजार अडीच कोटी लोकांना ग्रासणार; औषध नाही पण सावध तर व्हा!

Parkinsons Disease Update : मागील काही वर्षांच्या काळात जगभरात विविध आजारांनी थैमान घातले आहे. हृदयरोग, डायबिटीस, कॅन्सर यांसारख्या आजारांची माहिती सर्वांनाच आहे. पण काय तुम्हाला पार्किन्सन आजार माहिती आहे का ? मागील दहा ते पंधरा वर्षांचा आढावा घेतला तर लक्षात येते की हा आजार जगभरात वेगाने फैलावत चालला आहे. हा आजार तसा गंभीर म्हणावा लागेल. यामुळे रुग्णाची लाईफस्टाईल प्रभावित होते. या आजारात शरीराचे अवयव विशेष करून हात आणि पायांत सारखे कंपन होत राहते. ही समस्या कायम राहते त्यामुळे व्यक्तीला रोजची कामे करणे देखील कठीण होऊन जाते.

वैज्ञानिकांनी अभ्यास करून या आजाराबाबत लोकांना अलर्ट केले आहे. ज्या वेगाने हा आजार वाढत चालला आहे त्यावरून येत्या 2050 पर्यंत जगातील अडीच कोटींपेक्षा जास्त लोक या आजाराच्या विळख्यात सापडू शकतात अशी भीती आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या आजारावर अजून कोणतेही औषध उपलब्ध नाही.

पार्किसन आजाराचे रुग्ण वाढताहेत

चीन येथील कॅपिटल मेडिकल युनिव्हर्सिटी सहीत काही अन्य शोधकर्त्यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. सन 2021 च्या तुलनेत 2050 पर्यंत पार्किन्सन आजाराच्या रुग्णात 112 टक्के वाढ होऊ शकते. यामुळे सन 2050 पर्यंत अडीच कोटींपेक्षा जास्त लोक या आजाराच्या विळख्यात सापडू शकतात. जसजसे वय वाढते तसे या आजाराने ग्रस्त होण्याची शक्यता वाढू लागते.

काय तु्म्ही सुद्धा 6 तासांपेक्षा जास्त वेळ बसून काम करता? मग, ‘या’ आजारांचा नक्कीच धोका

ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित एका अहवालात म्हटले आहे की एकट्या दक्षिण आशियात (South Asia) आगामी वीस वर्षांत या आजाराच्या रुग्णांची संख्या 68 लाख असू शकते. हा आजार भारतात सुद्धा वेगाने वाढत चालला आहे. भारतात प्रत्येक एक लाख लोकांत पार्किसन आजाराचे 15 ते 43 रुग्ण असू शकतात.

आजाराचा कुणाला सर्वाधिक धोका

मेडिकल रिपोर्ट्सनुसार महिलांच्या तुलनेत पुरुषांना या आजाराचा धोका जास्त असतो. पुरुष आणि महिला यांच्यात सन 2021 मध्ये या आजाराचा अनुपात 1.46 टक्के इतका होता. 2050 पर्यंत हे प्रमाण 1.64 टक्के इतके होऊ शकते. साधारणपणे हा आजार 50 वर्षे वयाच्या पुढे सुरू होतो. काही परिस्थितीत कमी वयाच्या लोकांमध्ये हा आजार दिसून आला आहे. परंतु अशा रुग्णांचे प्रमाण कमी आहे.

एखाद्या कुटुंबातील व्यक्तीला हा आजार असेल तर अनुवंशिक असण्याची शक्यता असते. तसेच घातक रसायने, कीटकनाशके अशा पदार्थांच्या सातत्याने संपर्कात येत असल्यास अशा लोकांमध्ये हा आजार होण्याची जास्त शक्यता असते.

पार्किन्सन आजाराची माहिती घ्या

पार्किन्सन आजार शरीरातील नर्व्हस सिस्टीमशी संबंधित आजार आहे. मेंदूच्या ज्या भागाद्वारे शरीराची संपूर्ण हालचाल नियंत्रित होते त्या भागावर परिणाम होतो. यामुळे शरीरातील अवयवांत कंपन आणि स्नायूंत ताण निर्माण होतो. याबरोबरच रुग्णाला विचार करणे, शरीराचे संतुलन ठेवण्यात अडचणी येतात. हात आणि पाय सारखे कंपन पावत असल्याने व्यक्तीला रोजची कामे करताना अनेक अडचणी येतात.

पार्किन्सन आजाराची लक्षणे रूग्णांनुसार वेगवेगळी असू शकतात. सुरुवातीच्या काळात लक्षणे हलकी असतात. त्यामुळे आजार लवकर लक्षात येत नाही. शरीराच्या अवयवांत कंपन होत राहणे हे सामान्य लक्षण आहे. हात आणि बोटांत कंपन सुरू होते. काही वेळा पायात आणि जबड्यात देखील कंपन होऊ शकते. इतकेच नाही तर व्यक्ती आराम करत असतानाही त्याच्या हातात कंपन दिसू शकते. या व्यतिरिक्त काही लोकांना बोलण्यास त्रास होऊ शकतो.

टॅटू काढताय मग, आताच सावध व्हा, ‘लिंफोमा’ कॅन्सरचा धोका; रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

पार्किन्सन आजारावर औषध नाही

आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की पार्किन्सन आजाराला ठीक करता येत नाही. या आजारावर कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. काही औषधे लक्षणांना नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. काही लोकांना शस्त्रक्रिया करावी लागू शकते. रोजच्या जीवन शैलीतील बदल या आजाराची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात. फायबर युक्त खाद्यपदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास तसेच द्रव पदार्थ भरपूर प्रमाणात घेतल्यास अपचन रोखण्यास मदत मिळते. या आजारात अपचन होणे ही सामान्य समस्या आहे. तसेच नियमित व्यायाम केल्याने स्नायूंमध्ये ताकद, चालण्याची क्षमता, लवचिकता आणि संतुलन चांगले होऊ शकते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube