Tamannaah Bhatia: अभिनेत्रीने ‘अरनमानाई 4’ बद्दल मानले प्रेक्षकांचे आभार, म्हणाली…

Tamannaah Bhatia: अभिनेत्रीने ‘अरनमानाई 4’ बद्दल मानले प्रेक्षकांचे आभार, म्हणाली…

Tamannaah Bhatia On Aranmanai 4: पॅन इंडिया स्टार अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia ) हिने तिच्या नवीन रिलीज झालेल्या ‘अरनमानाई 4’ च्या (Aranmanai 4) यशासाठी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. या चित्रपटाने तमिळ चित्रपट उद्योगात एक नवा रेकॉर्ड रचला आहे आणि 2024 चा पहिला हिट चित्रपट म्हणून उदयास आला. याने प्रेक्षक तसेच समीक्षकांकडून खूप तोंडभरून कौतुक मिळवलं आणि बॉक्स ऑफिसवर (Box Office) पहिल्या वीकेंडमध्ये 20 कोटींहून अधिक कमाई केली.


अभिनेत्री तमन्नाने तिच्या सोशल मीडिया (social media) प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला यामध्ये लोकांनी थिएटरमध्ये सुंदर सी दिग्दर्शनाचा किती आनंद घेतला हे व्यक्त केले. प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळतंय यासाठी मी कृतज्ञ आहे. जगभरात 21 कोटींहून अधिक कलेक्शनसह याने बॉक्स ऑफिसवर (Box Office) दमदार कमाई केली आहे. सुंदर सी दिग्दर्शित या हॉरर कॉमेडीमध्ये सेल्वी आणि डॉ. माया यांची भूमिका करणाऱ्या तमन्ना आणि राशीच्या (Raashii Khanna) अभिनयाचं सर्वत्र तोंडभरून कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

कामाच्या आघाडीवर तमन्ना तेलगू चित्रपट ‘ओडेला 2’ मध्ये ‘शिवशक्ती’ म्हणून रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. जॉन अब्राहमसोबत निखिल अडवाणीच्या ‘ वेदा ‘ या हिंदी चित्रपटातही ती दिसणार आहे. OTT आघाडीवर ती करण जोहरच्या निर्मिती उपक्रम, ‘डेअरिंग पार्टनर्स’ मध्ये चमकणार आहे. ही वेब-सिरीज या वर्षाच्या सुरुवातीला जाहीर करण्यात आली होती. तिच्याकडे एक शीर्षकहीन OTT चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन नीरज पांडे करणार आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून अखेर गौरव मोरेची एक्झिट; म्हणाला, ‘हे सांगता खूप वाईट वाटतंय…’

गेल्या काही दिवसांपासून तमन्ना ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेता विजय वर्मा आणि तमन्नाच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. तमन्नानं विजयसोबतच्या तिच्या नात्याबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं. ती म्हणाली होती की, विजय हा तिच्या हॅप्पी प्लेससारखा आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज