IFFI:वेव्ह्ज बाजार आणि सोनी पिक्चर्स यांच्यात करार; देशभरातील लेखक, निर्माते आणि क्रिएटर्सना मिळणार मोठी संधी!

IFFI WAVES Bazaar Sony Pictures: WAVES Bazaar आणि Sony Pictures च्या उपक्रमामुळे देशभरातील लेखक, क्रिएटर्सना नव्या संधी मिळणार आहेत.

IFFI WAVES Bazaar Sony Pictures: WAVES Bazaar आणि Sony Pictures च्या उपक्रमामुळे देशभरातील लेखक, क्रिएटर्सना नव्या संधी मिळणार आहेत.

IFFI WAVES Bazaar Sony Pictures India Content Creator Initiative: गोवा येथे सुरू असलेल्या 57 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात (IFFI) नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NFDC) आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया (SPNI) यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारांतर्गत वेव्ह बाजार, SPNI कॉटेन्ट क्रिएटर सबमिशन इनिशीएटीव्ह वेव्ह्ज बझार × SPNI कंटेंट क्रिएटर सबमिशन इनिशिएटिव्ह सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे देशभरातील लेखक, कंटेंट क्रिएटर्स आणि निर्मिती संस्थांना (Production Houses) आपली मूळ संकल्पना थेट सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे.

‘OM: Operation Mole’मध्ये धनुष आणि साई पल्लवीची दमदार केमिस्ट्री, साईचा अ‍ॅक्शन अवतार प्रेक्षकांच्या पसंतीस

या उपक्रमासाठी हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली या भाषांमध्ये संकल्पना मागवण्यात आल्या आहेत. फिक्शन आणि नॉन-फिक्शन अशा दोन्ही प्रकारांतील संकल्पना सादर करता येणार आहेत. यामध्ये फिक्शन सीरिज, प्रीमियम टीव्ही कंटेंट, रिअ‍ॅलिटी शो, गेम आणि स्पर्धात्मक कार्यक्रम, टॅलेंटवर आधारित कार्यक्रम तसेच अन्य अनस्क्रिप्टेड संकल्पनांचा समावेश आहे.

प्राप्त झालेल्या संकल्पनांमधून निवडक अर्जदारांना सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियासमोर आपली कल्पना सादर करण्यासाठी (Pitch) आमंत्रित केले जाईल. त्यानंतर या संकल्पनांचा संभाव्य निर्मितीसाठी विचार केला जाणार आहे.

शेवटच्या लोकलमधला थरार पुन्हा रंगमंचावर, बदलत्या पिढीच्या नजरेतून ‘प्रपोजल’ उलगडणार – राजन ताम्हाणे

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली NFDC चे वेव्ह्ज बाजार (WAVES Bazaar) हे व्यासपीठ कार्यरत आहे. देशातील मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रतिभावंतांना उद्योगाशी जोडण्याचे काम या व्यासपीठाच्या माध्यमातून केले जाते. या नव्या सहकार्यामुळे प्रादेशिक भाषांमधील आणि विविध भागांतील नव्या कथांना मोठे व्यासपीठ मिळण्याची अपेक्षा आहे.

या सामंजस्य करारावेळी NFDC चे अध्यक्ष जी. कृष्णकुमार म्हणाले, “IFFI हा चित्रपटसृष्टीचा आणि चित्रपट निर्मितीशी जोडलेल्या लोकांचा उत्सव आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून जगभरातील कथा, संस्कृती आणि सर्जनशील आवाज एकत्र येतात. चित्रपटांची विविधता आणि त्यातील वेगवेगळे आवाज यामुळे यंदाचा महोत्सव विशेष ठरतो. ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ ही संकल्पना चित्रपटसृष्टीचा आत्मा अचूकपणे मांडते.”

‘अ‍ॅव्हेंजर्स : डूम्सडे’ची भारतात रिलीजपूर्वीच जोरदार क्रेझ, नवी मुंबईत एका तिकिटाची किंमत तब्बल 4 हजार रुपये

NFDC चे व्यवस्थापकीय संचालक धीरज सिंह म्हणाले, “वेव्ह्ज बाजार हे सर्जनशील प्रतिभा आणि मनोरंजन क्षेत्रातील विविध घटकांमध्ये अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्याचे काम करत आहे. सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियासोबतच्या या सहकार्यामुळे लेखक, क्रिएटर्स आणि निर्मिती संस्थांना विविध भाषा आणि स्वरूपांमध्ये आपल्या मूळ संकल्पना सादर करण्यासाठी नव्या संधी उपलब्ध होतील.”

तर सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव बॅनर्जी म्हणाले, “देशभरात प्रचंड सर्जनशील प्रतिभा आणि नावीन्यपूर्ण कल्पना आहेत. मात्र, यातील अनेक कल्पनांना प्रस्थापित व्यासपीठांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत नाही. NFDC च्या वेव्ह्ज बाजार सोबतची ही भागीदारी लेखक आणि क्रिएटर्सना विविध भाषा आणि स्वरूपांमध्ये आपल्या मूळ संकल्पना आमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या अधिक संधी उपलब्ध करून देणारे पाऊल आहे. प्रेक्षकांसाठी नव्या दृष्टिकोनातून सादर होणाऱ्या दर्जेदार कथा आणि कल्पना शोधण्याची आम्हाला उत्सुकता आहे.”

57 वा इफ्फी सर्वांसाठी प्रवेश योग्य आणि समावेशक बनवण्यासाठी एनएफडीसी ची ‘स्वयं’ बरोबर भागीदारी

दरम्यान, या उपक्रमासाठी अर्ज स्वीकारण्याची आणि त्यातील संकल्पनांची प्राथमिक निवड करण्याची जबाबदारी NFDC कडे असेल. इच्छुक लेखक, क्रिएटर्स आणि निर्मिती संस्थांना वेव्ह्ज बाजार च्या अधिकृत पोर्टलवर (wavesbazaar.com) आपल्या संकल्पना सादर करता येतील. परस्पर संमतीने निश्चित केलेल्या निकषांनुसार अर्जांची छाननी केली जाईल. निवड झालेल्या अर्जदारांना पुढील प्रक्रियेसाठी SPNI समोर आपली संकल्पना मांडण्याची संधी दिली जाणार आहे.

follow us