In Car :अभिनेत्री रितीका सिंगने सांगितला इन कारमधील थ्रिलर अनुभव
मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री रितिका सिंगचा आगामी चित्रपट ‘इन कार’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. नुकतचं या चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर आलं होतं. जबरदस्त थ्रिलरने भरपूर हा चित्रपट एका कॉलेज स्टूडेंटची खरी कहाणी आहे. नुकतचं निर्मात्यांकडून या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
आता अभिनेत्री रितीका सिंगने इन कारमधील थ्रिलर अनुभव सांगितला. ती म्हणाली, ‘हर्षवर्धन सर आणि मी शुटींगच्या काही भागांमध्ये माझे केस न धुण्याचा निर्णय घेतला, कारण मलाअतिशय विस्कळीत दिसायचे होते आणि या चित्रपटातील सातत्य अत्यंत महत्त्वाचे होते कारण संपूर्ण चित्रपट एका दिवसाची कथा आहे. खरं तर, ही 2 तासांची कथा आहे. जी रीअल-टाइममध्ये उलगडते, त्यामुळे केस, मेकअप आणि कपडे समान स्वरूप राखणे महत्त्वाचे होते. म्हणून, आम्ही शेवटी शूट झाल्यानंतर, माझे केस इतके घाणेरडे आणि इतके गुंफलेले होते, की ते धुण्यासाठी मला हेअर सलूनमध्ये जावे लागले, मला व्यावसायिक मदतीची आवश्यकता होती. सलूनच्या कर्मचार्यांनी मला विचारले की मी माझ्या केसांसाठी असे काय केले आहे, आणि मी त्यांना सांगितले की मी जीवन बदलणाऱ्या पर्वतीय साहसावर गेलो आहे.’
‘…Yuvraj Singh च्या आईने युवराजची कॉलर धरून काढले घराबाहेर’; पाहा VIDEO
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, या चित्रपटाच्या कथानक जबरदस्त थ्रिलरने भरपूर अतिशय आकर्षक कथा आहे आणि ती शेवटपर्यंत तुम्हाला तुमच्या सीटवर अडकवून ठेवेल. हा चित्रपट हरियाणामध्ये संपूर्णपणे चालत्या कारमध्ये चित्रित करण्यात आला आहे.
त्यागोदर या चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर आलं होतं. यामध्ये रितिका सिंग शिवाय मनीष झांझोलिया, संदीप गोयत, सुनील सोनी आणि ज्ञान प्रकाश यांच्या देखील भूमिका आहेत. हा चित्रपट एका कॉलेज स्टूडेंटची खरी कहाणी आहे. या पोस्टरमध्ये रितिकाच्या चेहऱ्यावर दुखापतीच्या खुणा स्पष्ट दिसत असून ती खूप घाबरलेली दिसत आहे.
हर्षवर्धनने या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. हा चित्रपट 3 मार्च 2023 रोजी थिएटरमध्ये हिंदी व्यतिरिक्त तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.