अनिल कपूर होस्ट करत असलेल्या ‘इंडिया के टॉप 1% चा प्रीमियर होणार 5 सप्टेंबरला
प्रेक्षकांची मने जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय ठरलेला फॉरमॅट ‘द 1% क्लब’ आता भारतात ‘इंडिया के टॉप 1%’ या नावाने पदार्पण करत आहे.
India’s Top 1% : या फेस्टिव्ह सीझनमध्ये स्टार प्लस आणि जिओहॉटस्टार घेऊन येत आहेत भारतातील सर्वात मोठा फॅमिली गेम शो ‘इंडिया के टॉप 1%’, जो 5 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेदरलँड्स, जर्मनी, स्पेन, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, तुर्की, युक्रेन, मेक्सिको आणि अमेरिका अशा देशांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय ठरलेला फॉरमॅट ‘द 1% क्लब’ आता भारतात ‘इंडिया के टॉप 1%’ या नावाने पदार्पण करत आहे.
बॉलिवूड आयकॉन आणि भारताचा सर्वात मोठा ‘कॉमन मॅन’ अनिल कपूर या शोचे होस्ट आहेत. हा शो क्विझ जॉनराला एक ताजेतवाने रूप देतो. इथे ज्ञानापेक्षा विचार करण्याची पद्धत महत्त्वाची आहे. पारंपरिक क्विझ शोच्या तुलनेत ‘इंडिया के टॉप 1%’ हा शो लॉजिक, ऑब्झर्वेशन आणि कॉमन सेन्सवर आधारित आहे. सर्वांसाठी डिझाइन केलेला हा फॉरमॅट प्रत्येक वयोगटातील लोकांना घरबसल्या देखील खेळण्याची संधी देईल आणि प्रत्येक लिव्हिंग रूमला एका फॅमिली गेम नाईटमध्ये बदलेल.
राज्यातील रक्तकेंद्रांवर एफडीएची कडक नजर; नियमांचे पालन बंधनकारक, उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
ग्रँड प्रीमियरपूर्वी आपल्या उत्साहाबद्दल बोलताना अनिल कपूर म्हणाले, “मला ‘इंडिया के टॉप 1%’ ची तारीख जाहीर करताना खूप आनंद होतो आहे. हा शो 5 सप्टेंबरपासून आपल्या टीव्हीवर दिसणार आहे. हा असा शो आहे की जो प्रेक्षकांनी यापूर्वी कधीच अनुभवला नसेल. इंडिया के टॉप 1%’ हा शो तुम्हाला सतत आश्चर्याचे धक्के देईल आणि सजग ठेवेल कारण इथे ज्ञानापेक्षा विचार करण्याची पद्धत महत्त्वाची आहे. प्रत्येक चॅलेंज तुमच्या ऑब्झर्वेशन, लॉजिक, प्रेझेन्स ऑफ माइंड आणि प्रेशरमध्ये शांत राहण्याच्या क्षमतेची कसोटी पाहील.
यातली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे टीव्हीवरच्या प्रत्येक स्पर्धकासोबत, प्रेक्षक देखील घरबसल्या खेळू शकणार आहेत आणि आपल्या विचार करण्याची पद्धत आजमावू शकणार आहे. यातले काही क्षण तुम्हाला आश्चर्यचकित करतील, काही क्षण तुमच्या पहिल्या अंतःप्रेरणेला प्रश्न विचारायला लावतील तर काही क्षण तुम्हाला जाणीव करून देतील की बुद्धिमत्ता अनेक प्रकारची असू शकते. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही भारतातील टॉप 1% मध्ये सामील होऊ शकता, तर आत्ताच रजिस्टर करा आणि हे चॅलेंज स्वीकारा.” ‘इंडिया के टॉप 1%’ पाहा 5 सप्टेंबरपासून, फक्त स्टार प्लस आणि जिओहॉटस्टारवर.