Prajakta Gaikwad: जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणावर प्राजक्ता गायकवाडची संतप्त पोस्ट; म्हणाली…’रक्त उसळलंय…’

Prajakta Gaikwad: जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणावर प्राजक्ता गायकवाडची संतप्त पोस्ट; म्हणाली…’रक्त उसळलंय…’

Prajakta Gaikwad Post: सध्या जोरदार चर्चा आहे ती म्हणजे जालन्यातील लाठीचार्जची. यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण पेटल्याचे बघायला मिळत आहे. यावेळी काही मराठी कलाकारांनी यावर प्रतिक्रिया द्यायला आता सुरूवात केली आहे. काल ‘आई कुठे काय करते’ या सिरियलमधील अभिनेत्री अश्विनी महागडे (Ashwini Mahangde) हिनं सोशल मीडियावर (Social media) एक पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajakta Gaikwad (@prajaktaa.gaikwad)


त्यामध्ये तिने या प्रकरणावरून जोरदार निषेध व्यक्त केला होता. आता त्यानंतर एका मोठ्या आता अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनेदेखील या प्रकारावर संतप्त टीका केली आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) हिने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ (Swarajrakshak Sambhaji) या सीरियलमध्ये महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली होती. ( Marathi Serial) तिने साकारलेल्या या भूमिकेचा सर्वत्र जोरदार कौतुक झालं. यासोबतच तिचा मोठा चाहतावर्ग देखील खूप वाढला.

सोशल मीडियावर सक्रिय राहून ती समाजामध्ये घडणाऱ्या तिला आवडणाऱ्या किंवा न आवडणाऱ्या गोष्टींबद्दल संतप्त टीका केली आहे.आताही तिने या लाठीचार्ज घटनेबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.प्राजक्ताने संतप्त होत म्हणाली आहे की, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या सिरीयलमधील एक फोटो शेअर केला.

Hemant Dhome: जालना लाठीचार्जवर मराठी अभिनेता संतापला; म्हणाला, ‘राजकारणासाठी सारं..’

या फोटोत ती रागाने बघत असल्याचे बघायला मिळत आहे. हा तिचा फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे की, “रक्त उसळलंय…रक्त पेटलंय.” याबरोबरच तिने ‘९६ कुळी मराठा’, ‘अभिमान’, ‘एक मराठा लाख मराठा’ हे हॅशटॅग यावेळी सोशल मीडियाला वापरले आहे. आता तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टवर कमेंट करत असताना तिचे चाहते अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असल्याचे बघायला मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube