Shah Rukh Khan च्या ‘जवान’ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात; प्रदर्शनाअगोदरच सिनेमाने केली ‘एवढी’ कमाई

  • Written By: Published:
Shah Rukh Khan च्या ‘जवान’ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात; प्रदर्शनाअगोदरच सिनेमाने केली ‘एवढी’ कमाई

Jawan Advance Booking: किंग खान म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. ‘पठाण’ला (Pathan) मिळालेल्या यशानंतर आता चाहते त्याच्या ‘जवान’ सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहे. (Social media) हा सिनेमा ७ सप्टेंबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील किंग खानचा फर्स्ट लूक, टीझरला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. आता नुकतंच या सिनेमाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून प्रदर्शनाअगोदरच या सिनेमाने जोरदार कमाई करायला सुरुवात केली आहे.

विदेशानंतर आता भारतात देखील या सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार युएसएमध्ये ॲडव्हान्स बुकिंगमध्ये या सिनेमाने प्रदर्शनाअगोदरच १.२ कोटींचा गल्ला कमावला आहे. युएसएनंतर आता जर्मनी आणि ऑस्ट्रेलियात देखील या सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.

त्यांनी केलेल्या ट्विटनुसार पहिल्याच दिवशी ७ लाख तिकीटांची विक्री झाली आहे. त्यानुसार, बुकिंगमधून पहिल्याच दिवशी जवानाला २० कोटींचे एकूण कलेक्शन झाले आहे. सिनेपोलिस, पीव्हीआर आणि आयनॉक्ससारख्या राष्ट्रीय मल्टिप्लेक्सने ३ लाखांहून अधिक तिकिटे बुक करण्यात आली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)


एकूण किती तिकिटे बुक झाली
पीव्हीआर – १ लाख ५१ हजार २७८
आयनॉक्स – १ लाख ६ हजार २९७
सिनेपोलिस – ५२ हजार ६१५
एकूण तिकीट – ३ लाख १० हजार १९०
कमाई – ११. ९८ कोटी रुपये

दिल्ली-एनसीआरमध्ये ५४,२३८ तिकिटे (२.५७ कोटी), मुंबईत ५०,७०१ तिकिटे (२.०८ कोटी), बेंगळुरूमध्ये ४८,१८४ तिकिटे (१.८४ कोटी), हैदराबादमध्ये ६८,४०७ तिकिटे (१.६६ कोटी), कोलकातामध्ये ४५,९७७ तिकिटे (४५,९७७ कोटी) विकली गेल्याचे ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच चेन्नईमध्ये ६०,४१५ तिकिटे (१.०६ कोटी) विकली गेली आहेत. ही सर्व तिकिटे पहिल्या दिवसासाठी म्हणजेच ७ सप्टेंबरसाठी बुक करण्यात आली आहेत.

Jaane Jan चा ट्रेलर रिलीज; विद्या, तापसीनंतर करीना दिसणार मर्डर मिस्ट्रीत

या सिनेमात किंग खानच्या जोडीला साऊथची तगडी स्टारकास्ट असणार आहे. यामध्ये किंग खानबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हिंदीसोबतच हा सिनेमा तमिळ, तेलगु भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.

‘जवान’ हा किंग खानचा या वर्षातील दुसरा सिनेमा आहे. जवाननंतर, तो राजकुमार हिरानीच्या ‘डंकी’मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या वर्षी प्रदर्शित झालेला ‘पठाण’ हा किंग खानच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट सिनेमा ठरला आहे. त्यानंतर आता सर्वांच्या नजरा किंग खानच्या ‘जवान’वर खिळल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube