Jiah Khan आत्महत्या प्रकरणात सूरज पांचोलीची निर्दोष मुक्ततेनंतर जियाच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली ‘माझ्या मुलीचा मृत्यू कसा…’

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 28T142645.247

Jiah Khan case: अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) मृत्यू प्रकरणामध्ये सूरज पांचोलीची (Sooraj Pancholi) निर्दोष मुक्तता करण्यात आली. (Jiah Khan case) कोर्टाने जियाची आई राबिया खान यांना या निकालाल आव्हान देण्याची मुभा कायम ठेवली आहे. (Jiah Khan suicide case) या प्रकरणामध्ये सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर आता जियाची आई राबिया खान यांची न्यायालयच्या या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया आली आहे.

नेमकं काय म्हणाली जियाची आई?

जिया खानची आई राबिया खानने दिलेल्या माहितीनुसार, ‘जिया खानला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप फेटाळण्यात आला आहे. या प्रकरणाचा शेवटी आज निकाल लागला आहे. पण मग माझ्या मुलीचा मृत्यू कशामुळे झाला आहे? असा सवाल तिने आता उपस्थितीत केला आहे.

परंतु मृत्यूचे कारण तर अद्याप स्पष्ट झाले नाही. मी सुरुवातीपासून सांगितले होते की, हे प्रकरण हत्येचे आहे. आता आम्ही उच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

जियाच्या आईचे पंतप्रधान मोदींना पत्र

२०१७ मध्ये राबिया यांनी आपल्या मुलीला न्याय मिळावा, याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील लिहिले होते. यानंतर सूरज पांचोलीने मुंबई उच्च न्यायालयाला खटला लवकरात लवकर चालविण्याची विनंती करण्यात आली होती.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

राबिया खान या न्यायालयामध्ये सांगितले होते की, ‘जियाने मला सांगितले की, सूरज हा तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा’ जियाने वयाच्या १८ व्या वर्षी राम गोपाल वर्मा यांच्या ‘निशब्द’ या सिनेमामधून अभिनयक्षेत्रामध्ये पदार्पण केली होती. या सिनेमाने तिने अमिताभ बच्चन यांच्याबरोबर स्क्रिन शेअर केली होती. तसेच २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या गजनी या सिनेमात जियाने शेवटचे काम केले होते.

Tags

follow us