जिओ स्टुडिओज आणि बी62 स्टुडिओजने स्पाय-अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘धुरंधर द रिव्हेंज’ चा ट्रेलर रिलीज केला

जिओ स्टुडिओज आणि बी62 स्टुडिओज यांनी आदित्य धर दिग्दर्शित स्पाय-ऍक्शन थ्रिलर चित्रपट ‘धुरंधर: द रिव्हेंज’चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (38)

trailer of Aditya Dhar’s spy-action thriller film ‘Dhurandhar The Revenge’ : जिओ स्टुडिओज आणि बी62 स्टुडिओज यांनी आदित्य धर दिग्दर्शित स्पाय-ऍक्शन थ्रिलर चित्रपट ‘धुरंधर: द रिव्हेंज’चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत रणवीर सिंह दिसणार आहेत. ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. भव्य स्केल, प्रचंड ताण-तणाव आणि धडाकेबाज अ‍ॅक्शनने भरलेला हा ट्रेलर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘धुरंधर’ हा पहिला भाग बॉक्स ऑफिसवर मोठा हिट ठरला होता आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठ्या यशस्वी चित्रपटांपैकी एक मानला गेला.

आता त्याचा पुढील भाग ‘धुरंधर: द रिव्हेंज’ अधिक मोठ्या आणि भव्य स्वरूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. यामध्ये अ‍ॅक्शन, थरार आणि दांव-पेच यांची पातळी आणखी वाढवण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये रणवीर सिंह जसकीरत सिंह रंगी या भूमिकेत पुन्हा एकदा दमदार अंदाजात दिसत आहेत. यावेळी ते जसकीरत आणि हमझा अशा दोन वेगवेगळ्या अवतारांत दिसणार आहेत. कथेला आणखी रंगत आणताना आर. माधवन अजय सान्याल या रणनीतीकाराच्या भूमिकेत झळकतात.

Jyoti Waghmare : शिंदेंच्या फायर ब्रँड नेत्या ज्योती वाघमारेंची संपत्ती किती?

अर्जुन रामपाल आयएसआय मेजर इक्बाल या धोकादायक आणि प्रभावी भूमिकेत दिसतात, तर संजय दत्त एसपी चौधरी असलम या भूमिकेत ठळक उपस्थिती नोंदवताना दिसतात. वेगवान अ‍ॅक्शन सीन, धारदार संवाद आणि रोमांचक क्षणांनी भरलेला हा ट्रेलर पाहताना प्रेक्षकांना सिनेमागृहात टाळ्या-शिट्ट्या वाजवाव्याशा वाटतील, अशी झलक यातून मिळते. या चित्रपटाची मध्यवर्ती थीम “हौसला, इंधन आणि बदला” अशी असून, बदला आणि संघर्ष यांची कथा मोठ्या पडद्यावर भव्य स्वरूपात मांडण्यात आली आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि बी62 स्टुडिओज निर्मित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट हिंदीसह तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या हाय-ऑक्टेन स्पाय-ऍक्शन चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती आदित्य धर यांनी केली असून, ज्योती देशपांडे आणि लोकेश धर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दरम्यान, अंडरकव्हर एजंटच्या थरारक कथेवर आधारित हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. गुढीपाडवा आणि उगादी या सणांच्या पार्श्वभूमीवर, तसेच ईदच्या आधी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

follow us