Journey Trailer: एका अनोख्या लढाईची कथा सांगणाऱ्या ‘जर्नी’चा ट्रेलर प्रदर्शित

Journey Trailer: एका अनोख्या लढाईची कथा सांगणाऱ्या ‘जर्नी’चा ट्रेलर प्रदर्शित

Journey Trailer: सचिन जीवनराव दाभाडे निर्मित, दिग्दर्शित ‘जर्नी’ सिनेमाचा एका अनोख्या लढाईची रहस्यमय कथा सांगणारा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. (Marathi Movie) सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत या सिनेमात शंतनु मोघे, शर्वरी जेमेनिस, ( Journey Trailer Out) शुभम मोरे, अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकार गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने, माही बुटाला, निखिल राठोड यांच्या मुख्य भूमिका बघायला मिळणार आहे.

सचिन दाभाडे यांची कथा (Sachin Dabhade Story) असणाऱ्या या सिनेमाचे लेखन रवींद्र मठाधिकारी यांनी केले आहे. तर भास्कर देवेंग्रेकर, तानाजी माने, संतोष राठोड, अनिकेत अरविंद बुटाला हे ‘जर्नी’ चे सहनिर्माते असल्याची माहिती मिळत आहे. थरारक अशा या ट्रेलरमधून एक मुलगा बेपत्ता झाल्याचे बघायला मिळत असून त्याचे पालक त्याला शोधण्याचा प्रयत्न करत असतात.

आता हा मुलगा नेमकं कुठे बेपत्ता झाला आहे की, तो त्याच्या पालकांवर रूसून निघून गेला? हा बेपत्ता मुलगा नेमका कुठे आहे, अवघड वाटेवर त्याला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार आणि हा प्रवास त्याला नेमका कुठे घेऊन जाणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे चाहत्यांना १३ ॲाक्टोबर दिवशी मिळणार आहे.

Manapman Muhurta: सुबोध भावेंनी केली नव्या सिनेमाची घोषणा; शूटिंगलाही सुरुवात

दिग्दर्शक सचिन दाभाडे यांनी सांगितले आहे की,’जर्नी’ हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. आयुष्याशी, नात्यांशी आणि कुटुंबाशी असलेला संघर्ष यानिमित्ताने उलगडणार असल्याचे बघायला मिळणार आहे. ही ‘जर्नी’ चाहत्यांना बरंच काही देणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी मागे सुटत आहेत आणि त्याच पुन्हा परत आणण्याचा प्रयत्न ‘जर्नी’मध्ये बघायला मिळणार आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या चिमुकल्यांसोबत हा सिनेमा आवर्जून पाहावा.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube