Wamiqa Gabbi : ‘या’ अभिनेत्रींचे चित्रपटसृष्टीबद्दल धक्कादायक खुलासा; म्हणाली, “महिलांचे ओठ आणि गाल…”

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 30T161738.543

Wamiqa Gabbi : प्राइम व्हिडिओवर (Prime Video) नुकतीच प्रदर्शित झालेली ‘जुबली’ ही वेबसीरिज (Jubilee web series) सध्या जोरदार चर्चेत आहे. १९४० ते १९५० या काळामधील मुंबई सिनेमासृष्टीचा (Mumbai cinema industry) प्रवास आणि एका मोठ्या फिल्म स्टुडिओची (Film studio) कहाणी या सीरिजमधून प्रेक्षकांना दाखवण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Wamiqa Gabbi (@wamiqagabbi)


या सीरिजची जोरदार चर्चा देखील चाहते करत आहेत. यामुळे यातील कलाकारांचंही प्रचंड मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसून येत आहे. यातच एक महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री वामिका गब्बी (Wamiqa Gabbi) ही सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे. या सीरिजमधील वामिकाच्या कामाचे खूप मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Wamiqa Gabbi (@wamiqagabbi)


तिने दिलेल्या एका मुलाखतीच्या दरम्यान वामिकाने सिनेमासृष्टीतील पडद्यामागील गोष्टीवर धक्कादायक खुलासा केले आहे. आपल्या सिनेमासृष्टी आजही अभिनेत्रीच्या दिसण्याला काय महत्त्व आहे, यावर तिने धक्कादायक खुलासा एका मुलाखतीमध्ये केले आहे. फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीमध्ये वामिक म्हणाली की, “आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आज देखील महिलांच्या सुंदर चेहेऱ्याला प्रचंड महत्त्व दिले जात आहे.

महिलांचे ओठ आणि गाल अगदी परफेक्ट असले पाहिजे, म्हणजे झालं. मी स्वतःला या अशा गोष्टींपासून खूप लांब ठेवले आहे. फिल्म इंडस्ट्रीत लोक सुंदर दिसण्यासाठी काहीपण करत असतात, पण मी मात्र जे परफेक्ट नाही, अशा लोकांकडे आकर्षित होत असते. मी जशी आहे तशीच स्वतःवर प्रेम करते. ‘जुबली’ वेबसीरिजमध्ये वामिकाने निलूफर हे पात्र साकारली आहे.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

या सिरिजमध्ये वामिकाबसोबत सिद्धांत गुप्ता, अपारशक्ति खुराना, प्रोसेनजीत चॅटर्जी, अदिती राव हैदरी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसून आले आहेत. वामिका याअगोदर ‘ग्रहण’ या वेबसीरिजमध्येही चाहत्यांना दिसली होती. त्यातीलही तिचं काम चाहत्यांना मोठ्या प्रमाणात आवडले होते.

Tags

follow us