‘कांतारा: चॅप्टर 1’ चं पोस्टर, ऋषभ शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित

‘कांतारा: चॅप्टर 1’ चं पोस्टर, ऋषभ शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित

Kantara Chapter 1 Poster Released On Rishabh Shetty Birthday : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ने (Kantara Chapter 1) भारतीय सिनेमासृष्टीत एक नवा अध्याय सुरू केला. हा चित्रपट वर्षातील सर्वात मोठी ‘स्लीपर हिट’ ठरली. त्याने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवत नवे बेंचमार्क (Entertainment News) स्थापित केले. ‘KGF’, ‘कांतारा’ (Kantara) आणि ‘सालार’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या होम्बळे फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली होती.

पॅन-इंडिया पातळीवर ‘कांतारा’ने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत, तर भारतीय संस्कृती आणि लोककथांना जागतिक व्यासपीठावर सशक्तपणे सादर केले. आता या ब्लॉकबस्टरचा प्रीक्वल – ‘कांतारा: चॅप्टर 1’ जाहीर झाला असून तो वर्षातील सर्वाधिक अपेक्षित चित्रपटांपैकी एक बनला आहे. ऋषभ शेट्टीच्या अद्याप न पाहिलेल्या शक्तिशाली रूपातील पहिल्या पोस्टरने आधीच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. आता निर्मात्यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त आणखी एक नवीन पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाच्या शूटिंगची यशस्वी पूर्णता जाहीर केली आहे.

जबरदस्त घोटाळा! मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवायच प्रस्ताव मंजूर, निविदाही काढल्या

‘कांतारा: चॅप्टर 1’ ही हजारो प्रेक्षकांच्या मनाला भिडलेल्या कथेची सुरुवात सांगणारी कथा असेल. आता वेळ आहे, गर्जनेपूर्वीच्या शांततेची अनुभूती घेण्याची वेळ आहे. निर्मात्यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवरून पोस्टर शेअर करत लिहिलं की, जसा नवीन पोस्टर प्रदर्शित झाला, तसा सोशल मिडियावर आणि प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी अधिकच उत्साह पाहायला मिळाला. होम्बळे फिल्म्सची दूरदृष्टी, ऋषभ शेट्टीचे परिश्रम आणि पहिल्या भागाने निर्माण केलेली धाक यांच्या बळावर हा चित्रपट अजून एक ऐतिहासिक यश मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

‘कांतारा: चॅप्टर 1’साठी निर्मात्यांनी एक अत्यंत भव्य युद्ध दृश्य तयार केले आहे, ज्यामध्ये देश-विदेशातील तज्ञांचा सहभाग होता. या दृश्यासाठी 500 हून अधिक प्रशिक्षित योद्धे आणि जवळपास 3000 लोकांचा समावेश होता. हे शूट राज्यातील डोंगराळ भागात 25 एकर क्षेत्रात उभारलेल्या संपूर्ण गावात 45 ते 50 दिवसांपर्यंत करण्यात आले. हे दृश्य भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या दृश्यांपैकी एक मानले जात आहे.

‘सैयारा’ या बहुप्रतीक्षित प्रेमकथेचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार!

एकीकडे होम्बळे फिल्म्स प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे, तर दुसरीकडे आगामी काळात त्यांच्या कडे प्रेक्षकांना खास सिनेमॅटिक अनुभव देणारी चित्रपटांची दमदार लाईनअप आहे. यात प्रमुख आहे.
‘कांतारा: चॅप्टर 1’, जो 2 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे,
‘सालार: पार्ट 2 – शौर्यांग पर्वम’,
आणि इतर अनेक भव्य चित्रपट, जे भारतीय सिनेसृष्टीला एक नवीन उंची गाठवण्यासाठी सज्ज आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube