सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’चं मोशन पोस्टर प्रदर्शित! भारताच्या सर्वात क्रूर युद्धाची कहाणी आता रूपेरी पडद्यावर

सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’चं मोशन पोस्टर प्रदर्शित! भारताच्या सर्वात क्रूर युद्धाची कहाणी आता रूपेरी पडद्यावर

Battle of Galwan Motion poster released : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याच्या आगामी चित्रपटांबाबतच्या चर्चा नेहमीच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत असतात. विशेषतः गलवान खोऱ्यातील संघर्षावर आधारित असलेल्या त्याच्या नव्या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता होती. अखेर, सलमान खानच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ‘बॅटल ऑफ गलवान’ मोशन पोस्टर (Battle of Galwan) आज प्रदर्शित झाला आहे आणि चाहत्यांची प्रतीक्षा (Bollywood News) संपली आहे.

या मोशन पोस्टरमध्ये सलमान खान रक्ताने माखलेला चेहरा, रुबाबदार मिशी आणि डोळ्यांत देशभक्तीची ज्वाला घेऊन दिसतो. चित्रपटाच्या मूळ संकल्पनेवर प्रकाश टाकत, हे पोस्टर भारताच्या इतिहासातील सर्वात क्रूर पण गोळ्या न झाडता लढल्या गेलेल्या (Entertainment News) युद्धाची कहाणी सांगते. 15,000 फूट उंचीवर लडाखच्या गलवान खोऱ्यात घडलेला हा संघर्ष भारताच्या अदम्य साहसाचे प्रतीक ठरला आहे.

…तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल?, परप्रांतीय व्यापाऱ्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज

‘बॅटल ऑफ गलवान’ ही कहाणी आहे, 15 जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात भारतीय व चीनी सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाची. हे युद्ध पारंपरिक शस्त्रांऐवजी दगड, लाकडी काठ्या आणि नंगे हातांनी लढले गेले, कारण त्या भागात बंदुका वापरण्यावर बंदी होती. या संघर्षात दोन्ही देशांच्या जवानांना आपले प्राण गमवावे लागले आणि यामुळे जवळपास ४५ वर्षांनी सीमेवर मृत्यूची नोंद झाली.

महायुती सरकारच्या काळात 2 हजार 866 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; अंबादास दानवे सभागृहात आक्रमक

सलमान खान याच्या नव्या रूपात पाहणे हा अनुभव निश्चितच आगळा-वेगळा ठरणार आहे. भारताच्या वीर जवानांच्या बलिदानाची ही गाथा प्रत्येक भारतीयाने पाहिलीच पाहिजे, अशी भावना या मोशन पोस्टरमधून उमटते. ‘बॅटल ऑफ गलवान’ – एक असा चित्रपट, जो केवळ मनोरंजन नव्हे, तर प्रेरणा देणारी वास्तव कहाणीही ठरणार आहे. चित्रपटाबाबत अधिक माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube