Karan Singh Grover अभिनयापलीकडे जाऊन कलात्मक बाजू जपणारा अभिनेता…

Karan Singh Grover अभिनयापलीकडे जाऊन कलात्मक बाजू जपणारा अभिनेता…

Karan Singh Grover is not only actor but also artist : अभिनेता करण सिंग ग्रोव्हर ( Karan Singh Grover ) हा त्याच्या पॉवर-पॅक ऑन-स्क्रीन अभिनयाने कायम प्रेक्षकांना आपलंसं करतोय. टेलिव्हिजनपासून ते चित्रपट आणि ओटीटीपर्यंत करण ग्रोव्हरचा अभिनय हा कायम वेगळा ठरला आहे. अभिनयाच्या सोबतीने करण हा उत्तम आर्टिस्ट सुद्धा आहे.

…म्हणूनच मोदींनी सभा टाळून रोड शोचा आग्रह केला; शरद पवार गटाची खोचक टीका

करण सिंग ग्रोव्हरचा कलात्मक प्रवास हा अनोखा आणि तितकाच खास आहे ज्यात भावना आणि त्याचा दृष्टीकोन यांच हे मिश्रण आहे. जे कॅनव्हासवर स्पष्टपणे उलगडत जातं. डायनॅमिक ॲबस्ट्रॅक्ट्सपासून ते प्रभावी पोर्ट्रेटपर्यंतची त्यांची चित्रे अनेकदा कलाप्रेमींना आकर्षित करतात. अनेकदा अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर त्याच्या कलाकृतीची झलक शेअर केली आहे. याआधी करणने त्याच्या ‘देवी सीरीज’ नावाच्या कलेक्शनचा एक लूक शेअर केला होता.

या बद्दल बोलताना करण म्हणतो, ‘आम्ही गरोदर राहिल्यावर मी त्यावर काम सुरू केले. मला माहीत होते की ती येणार आहे आणि तिचे नाव देवी आहे.” बऱ्याचदा त्याच्या चाहत्यांनी आणि त्याच्या कलाकृतीचे कौतुक केले आहे. दरम्यान व्यावसायिक आघाडीवर प्रेक्षकांनी सिद्धार्थ आनंदच्या ‘फाइटर’ मध्ये त्याच्या अभिनयाची चमक पाहिली ज्यामध्ये त्याने हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्यासह इतरांसोबत स्क्रीन स्पेस शेअर केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज