खास रे टिव्हीचे संजय कांबळे यांचा डिजिटल स्टार महागौरव पुरस्काराने सन्मान

  • Written By: Published:
खास रे टिव्हीचे संजय कांबळे यांचा डिजिटल स्टार महागौरव पुरस्काराने सन्मान

कोल्हापूर: खास रे टिव्हीचे संजय श्रीधर कांबळे (Sanjay Kamble) यांना डिजिटल मीडिया पत्रकार आणि संपादक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गौरविण्यात आले आहे. कोल्हापूर येथे झालेल्या दुसऱ्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते डिजिटल स्टार महागौरव 2024 हा या पुरस्कार संजय कांबळे यांनी स्वीकारला आहे.

हेमंत सोरेन 31 तासांनंतर रांचीत, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदार भावूक; ईडीकडून अटकेची शक्यता

यावेळी चित्रपट अभिनेते गिरीश कुलकर्णी, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्यासह राज्यभरातून आलेले मीडिया क्षेत्रातील हजारो सदस्य उपस्थित होते. सोहम ग्रुपचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या प्रेरणेमुळेच हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामुळे खास रे टिव्हीची जबाबदारी आणखी वाढली असल्याचे संजय कांबळे यांनी म्हटले आहे.

‘भाजप आमदाराला रोखा’; रोहित पवारांची टोलेबाजी करत अजितदादांकडे विनवणी

खास रे कडून 2020 मध्ये आलेल्या कोरोना लाटेत लोकांना जागृत करण्यासाठी आणि प्रत्येक भारतीयाने लसीकरण करावे यासाठी “लस घ्या” गाण्याची संकल्पना मांडली होती.
ऊस उत्पादक शेतकरी आणि कर्मचारी यांच्या जगण्याला समर्पित ऊसाचा रस या गाण्याने महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा स्वॅग आणि ऊसाचा रस हटके स्टाईलने जगभरात पोहचवला. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे आयुष्य, त्यांचे प्रश्न मांडणाऱ्या “कष्ट घाम फुटेपर्यंत” ही वेबसिरीजही गाजली आहे. संजय कांबळे यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube