Shah Rukh Khan: किंग खानने रिंकू सिंगबद्दल म्हणाला, ‘बाप आहे बच्चा नही…’

Shah Rukh Khan: किंग खानने रिंकू सिंगबद्दल म्हणाला, ‘बाप आहे बच्चा नही…’

Shah Rukh Khan On Rinku Singh: कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फलंदाज रिंकू सिंगची (Rinku Singh) सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. आयपीएलच्या १६व्या सीझनमध्ये रिंकू सिंगची कामगिरी बघून कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचा मालक किंग खान (Shah Rukh Khan) स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने आपल्या एका प्रतिक्रियेने ट्विटरवर खळबळ उडाली आहे.

बॉलिवूड स्टार किंग खानने ट्विटरवर ऑनलाइन होता आणि #AskSRK वर प्रश्नानांवर उत्तरे देत होता. यावर एका चाहत्याने किंग खानला (King Khan) केकेआरचा बच्चा रिंकू सिंगबद्दल काही बोलण्यास सांगितले. यावर किंग खानने उत्तर दिले आहे की, रिंकू सिंग बाप आहे बच्चा नही!! या ट्विटनंतर किंग खान आणि रिंकू सिंगच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

रिंकू सिंह आहे तरी कोण?

रिंकू सिंग हा ५ चेंडूंमध्ये सलग पाच षटकार मारण्याचा अनोखा विक्रम केला आणि अत्यंत रोमहर्षक सामन्यात आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. रिंकू सिंगने आयपीएल २०२३ मध्ये हा पराक्रम केला आहे. आयपीएल २०२३ चा १३ वा सामना खेळला जात होता.

Raja Karale Passes Away : ‘भैरू पैलवान की जय’ फेम दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचं निधन

कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला शेवटच्या ५ चेंडूत २९ धावांची गरज होती. कोलकाता नाईट रायडर्सकडून रिंकू सिंग क्रीजवर उपस्थित होता. त्यावेळी गुजरात टायटन्सकडून यश दयाल शेवटच्या षटकात गोलंदाजी करायला आला. पहिल्या चेंडूवर उमेश यादवने १ धाव घेत रिंकू सिंगला स्ट्राइक दिली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube