Kiran Mane: ‘माणूस म्हणून तू…’, किरण मानेंची शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट
Kiran Mane Post: अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. किंग खानच्या वाढदिवसानिमित्त जगभरातून शाहरुखवर (Shah Rukh Khan) शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आता पुन्हा इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांनी किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Shah Rukh Khan birthday) पोस्टमध्ये किरण मानेंची किंग खानचं तोंडभरून कौतुक केलं आहे. तसेच त्याच्या सिनेमापासून त्या व्यक्तिमत्वापर्यंत अनेक गोष्टींवर खास पोस्ट केली आहे.
View this post on Instagram
शारख्या, त्यांना वाटलं सगळं जग आपल्या बापाचं हाय. आपन ‘बायकाॅट’ म्हन्लं की मानूस इंडस्ट्रीतनं आऊट ! आमच्या इरोधात बोलाल तर काम काढून घिवू. कोन पिच्चरला येनार नाय अशी व्यवस्था करू. ‘हम करे सो कायदा’ म्हनत त्यांनी गेमा करायला सुरूवात केली. कलाकारांमधली जी दोनचार टाळकी विरोधात बोलत होती, ती बी भेदरुन गप झाली. मग काय, बायकाॅट गॅंगला वाटलं ‘साला आपुनईच भगवान है”!
ह्या गॅंगच्या तू कायम टारगेटवर होतास. तू पाकिस्तानधार्जिना आहेस असं खोटं पसरवलं. तुझ्या मुलाला खोट्या प्रकरनात अडकवलं गेलं तवा तर गॅंगनं हैदोस घातला. लतादिदींच्या पार्थिवाजवळ फुंकर मारल्यावर ‘तू थुंकला’ असा कांगावा करत धिंगाना घातला. तू आतनं लै धुमसला असनार भावा… पन तरीबी संयमानं गप बसलास.
…लै मोठ्या गॅपनंतर तू आलास. नेहमीच्या स्वॅगमधी चालत… कापणारी नजर रोखत… केस उडवत. फूल्ल श्टाईल में ! बायकाॅट गॅंग चेकाळली. ‘आता ह्याला रस्त्यावर आनूया, लै माज करतोय स्स्साला’ म्हनत मोहिम सुरू केली. आल्याआल्या तू असा ‘पठाण’ लावला, का सात-आठशे करोड कमावल्याशिवाय काढलाच नाहीस. बायकाॅट गॅंग कळवळून बोंबलायला लागली. बाकी सगळं जग धुंद होऊन नाचत होतं “झुमे जो पठाण, मेरी जान, महफिल ही लूट जाये.”
कम्बख़्त कारस्थानी गॅंग धक्क्यातनं सावरेपर्यन्त ‘जवान’ लावलास… खाडकन मुस्काडात देत म्हन्लास, “बेटे को हाथ लगाने से पहले, बाप से बात कर”.. परत हजार करोडचा दांडगा धुमाकूळ !
शारख्या, माणूस म्हनून तू लै लै लै ग्रेट हायेस. तुझं समाजभान, तुझी बुद्धीमत्ता, तुझं वाचन, तुझा सेन्स ऑफ ह्यूमर… आन् सगळ्यात महत्त्वाचं, जे मी लै ‘रिलेट’ करतो, तो म्हन्जे संकटावर उल्टी चाल करून जानं. निधड्या छातीनं.
ज्या काळात सत्ताधार्यांविरोधात एक शब्दबी उच्चारनं म्हन्जे काम हातातनं घालवनं… नायतर मागे ईडी लावुन घेनं… लैच झालं तर तुरूंगात जानं. त्या दहशतीच्या काळात तू थेट सिनेमातनं मोठ्या पडद्यावर डाॅल्बी डिजीटल साऊंडमध्ये खुल्या आवाजात, डंके की चोटपर भारतीय नागरीकांना सांगीतलंस, “जात-पात-धर्म-संप्रदाय के लिए व्होट देने के बजाय, जो आपसे व्होट माॅंगने आए, आप उससे सवाल पुछो ! पुछो उससे के अगले पाॅंच साल तक तुम मेरे लिए क्या करोगे? मेरे बच्चोंकी शिक्षा के लिए क्या करोगे? मुझे नौकरी देने के लिए क्या करोगे?? मै अगर बिमार पड गया तो मेरे परिवार के लिए क्या करोगे??? अगले पाॅंच साल तक तुम मेरे देश को आगे बढाने के लिए क्या करोगे… पुछो उससे.”
शारख्या, आज तुझा बड्डे ! लै लै लै जग. आम्हाला बख्खळ आनंद दे. प्रेरना दे. मनोरंजन, स्वॅग आनि समाजभान याचा काॅम्बो असलेला सुपरस्टार लाभावा ही आमची ‘मन्नत’ खुदानं पुरी केलेलीच हाय. असेच भारी भारी, नादखुळा पिच्चर आनून तू आम्हाला ‘जन्नत’बी दाखव. लब्यू शारख्या.
Dunki Teaser: शाहरुखने वाढदिवशी चाहत्यांना दिलं सरप्राईज; ‘डंकी’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित
किरण मानें कामाबद्दल सांगायचं झालं तर ‘मुलगी झाली हो’ या सिरियलमधून घराघरात पोहोचलेले अभिनेते कायम चर्चेत असतात. या सिरियलमधून अचानक झालेल्या एक्झिटनंतर किरण माने अधिक प्रसिद्धीझोतात आल्याचे पाहायला मिळते. यानंतर त्यांनी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून चाहत्यांचा चांगलंच मनोरंजन केलं होत. सध्या ते वेगवेगळ्या विषयांवर लिहित असताना दिसतं आहे. किरण मानेंनी नुकतीच बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानसाठी एक पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच ते सध्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.