Om Raut: वडील पत्रकार अन् बडे राजकारणी तर मुलगा आदिपुरुषचा दिग्दर्शक
प्रेरणा जंगम
Om Raut: नुकताच प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपट प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाविषयी सुरु असलेला वाद सध्या चर्चेत आहे. अनेक ठिकाणी या चित्रपटाला विरोध होत असून आक्षेप घेतला जात आहे. या चित्रपटातील संवादांवर देखील मोठा आक्षेप घेण्यात आला असून आता निर्मात्यांनी संवाद बदलण्याचाही निर्णय घेतला आहे. या सगळ्यात चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) आणि लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntsheer) यांच्यावर ताशेरे ओढले जात आहेत. आदिपुरुष या चित्रपटाआधी ओम राऊतची चित्रपट विश्वातील कारकिर्द काय आहे हे जाणून घेऊया…
View this post on Instagram
ओम हा मूळचा मुंबईचा आहे. मुंबईतच त्याचा जन्म झाला असून त्यान महाविद्यालय पर्यंतचं शिक्षण मुंबईतच घेतले आहे. ओम राऊत हा ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भरतकुमार राऊत यांचा मुलगा आहे. भरतकुमार राऊत (Bharat Kumar Raut) हे शिवसेनेचे राज्यसभेतील खासदारही होती. तर त्याची आई ही टेलिव्हिजन निर्माती आहे. ओमचे आजोबा जयचंद्र बांदेकर हे चित्रपट संकलक आणि माहिती पटकार होते. लहानपणापासूनच ओम राऊतला मनोरंजन विश्वाची आवड होती. त्याने विविध नाटक आणि जाहिरातींमध्ये बालकलाकार म्हणून काम केले आहे.
1993 मध्ये त्याने करामती कोट या चित्रपटातून फिल्मी दुनियेत डेब्यू केला होता. या चित्रपटात त्याने मुख्य बालकलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अनेक नामवंत कलाकारांसोबत त्याने काम केलं होतं. तर ओम राऊतने माटुंग्याच्या डी. जी. रुपारेल महाविद्यालयातून पदविचं तर शाह अँड अँकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इंज शाह एन्ड अँकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगमध्ये बॅचलर डिग्री मिळवली आहे. त्यानंतर तो फिल्म आणि टेलिव्हिजनचं शिक्षण घेण्यासाठी न्यूयॉर्कला. त्याने न्यूयॉर्कमध्येच लेखक, दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं.
Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा
भारतात परतल्यावर क्रिएटिव्ह हेट म्हणून प्रसिद्ध प्रोडक्शन कंपनीत काम सुरु केलं. यानंतर त्याच्या दिग्दर्शनाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. ओम राऊतने मग मराठी चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं. 2015 मध्ये आलेला लोकमान्य एक युग पुरुष हा त्याने दिग्दर्शित केलेला पहिला मराठी चित्रपट ठरला. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेयरचा सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कारही मिळाला आहे. शिवाय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राज्य पुरस्कारही मिळाला. अभिनेता सुबोध भावेने या चित्रपटात लोकमान्य टिळकांची मुख्य भूमिका साकारली होती.
सिटी ऑफ गोल्ड, हॉँटेड थ्रीडी, लालबाग परळ या चित्रपटांची निर्मितीही त्याने केली आहे. त्यानंतर ओम राऊतची पावलं दिग्दर्शनासाठी हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळली. 2020 मध्ये त्याने तान्हाजी हा बिग बजेट ऐतिहासिक चित्रपट दिग्दर्शित केला. त्याने दिग्दर्शित केलेला हा पहिला हिंदी चित्रपट ठरला. प्रेक्षकांची पसंती तर या चित्रपटाला मिळाली शिवाय या चित्रपटावर पुरस्कारांचा वर्षाव झाला. 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार तान्हाजी या चित्रपटाला मिळाला. तर 2021 मध्ये या चित्रपटासाठी ओम राऊतला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी फिल्मफेयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
दादरमधील सावरकर स्मारक येथे सावरकरांच्या जीवनावर आधारित भव्य दिव्य लाईट एन्ड साऊंड शोची निर्मितीही त्याने केली होती. ज्यासाठी त्याचं भरभरुन कौतुकही झालं होतं. आता 2023 मध्ये आदिपुरुष हा बिग बजेट चित्रपट ओम राऊत घेऊन आला. प्रभाससारखा साउथ स्टार आणि बॉलीवुड सौंदर्यवती क्रिती सनॉन अशा मुख्य कलाकारांसह त्याने रामायणापासून प्रेरित चित्रपट बनवला आहे. मात्र या चित्रपटाला सध्या विविध क्षेत्रातून विरोध होत आहे. असं असलं तरी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आदिपुरुष चित्रपटानंतर ओम राऊतची सिनेकारकिर्द कसी असेल.. आगामी काळात तो कोणते चित्रपट घेऊन येतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.