चाहत्यांची प्रतीक्षा संपली, जितेंद्र कुमारच्या ‘कोटा फॅक्टरी सीझन 3’ वेब सिरीजची रिलीज डेट आऊट

चाहत्यांची प्रतीक्षा संपली, जितेंद्र कुमारच्या ‘कोटा फॅक्टरी सीझन 3’ वेब सिरीजची रिलीज डेट आऊट

Kota Factory Season 3: जितेंद्र कुमारची (Jitendra Kumar) ‘कोटा फॅक्टरी’ ही (Kota Factory) या वेब शोची (Web series) सर्वात लोकप्रिय सिरीज आहे आणि आता तिचे चाहते तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा वेब शो कोटा येथे IIT-JEE आणि NEET परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कथेवर आधारित आहे. त्याचा पहिला सीझन 2019 मध्ये यूट्यूबवर सुरू झाला आणि त्याला इतकी लोकप्रियता मिळाली की 2021 मध्ये नेटफ्लिक्सने त्याचा दुसरा सीझन रिलीज केला.

आता या सिरीजचा तिसरा सीझनही लवकरच प्रदर्शित होणार आहे. कोटा फॅक्टरीचा तिसरा सीझन कधी आणि कुठे पाहता येईल चला मग जाणून घेऊया…

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)


ओटीटीवर ‘कोटा फॅक्टरी सीझन 3’ कधी आणि कुठे पाहायचा?

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात नेटफ्लिक्सने ‘कोटा फॅक्टरी’च्या तिसऱ्या सीझनची झलक शेअर केली होती. ज्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसमोरील नवीन आव्हाने दाखवली होती. तुमच्या पेन्सिलला तीक्ष्ण करा आणि सर्व सूत्रे लक्षात ठेवा – जितू भैया आणि त्यांचे विद्यार्थी त्यांच्या सर्वात मोठ्या आव्हानासाठी तयार आहेत.

आता या बहुप्रतिक्षित सिरीजची रिलीज डेटही आली आहे. ETimes च्या अहवालानुसार, कोटा फॅक्टरी सीझन 3 सीरीज जूनमध्ये रिलीज होणार आहे. मात्र, खरी तारीख अद्याप कळू शकलेली नाही. पण रिपोर्टनुसार, सीझन 3 जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होऊ शकणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

‘कोटा फॅक्टरी’चे दिग्दर्शन राघव सुब्बू यांनी केले

‘कोटा फॅक्टरी’चे दिग्दर्शन राघव सुब्बू यांनी केले आहे. ‘द व्हायरल फिव्हर’साठी अरुणाभ कुमार यांनी याची निर्मिती केली आहे. ‘कोटा फॅक्टरी’ राजस्थानमधील कोटा येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) साठी अत्यंत स्पर्धात्मक प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित आहे.

Munjya Trailer : अंगावर काटाच! दिनेश विजानच्या ‘मुंजया’चा धडकी भरवणारा ट्रेलर, पाहा…

‘कोटा फॅक्टरी सीझन 3’ स्टार कास्ट

‘कोटा फॅक्टरी सीझन 3’ च्या स्टार कास्टबद्दल बोलायचे झाले तर, जितेंद्र कुमार आणि अहसास चन्ना व्यतिरिक्त या वेब शोमध्ये अलन खान, मयूर मोरे, रंजन राज सारखे स्टार्स दिसणार आहेत. यावेळी तिलोत्तमा शोम देखील या शोमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिरीजव्यतिरिक्त जितेंद्र वेब सीरिज ‘पंचायत 3’ मध्ये देखील दिसणार आहे. ‘पंचायत 3’ या महिन्यात 31 मे रोजी प्रदर्शित होत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज