Adipurush Trailer Launch: नटूनथटून आलेल्या Kriti Sanon ला बसावं लागलं जमिनीवर, पाहा Video

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 10T130302.675

Adipurush Actress Kriti Sanon: ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला आहे. गेल्या काही दिवसापासून या सिनेमाच्या ट्रेलरची लाँचचा कार्यक्रम पार पडला आहे. या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला सिनेमामधील सर्व स्टार कास्टने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. ट्रेलर लाँच कार्यक्रमाला चाहत्यांनी देखील मोठी गर्दी केली होती. यावेळी अभिनेत्री क्रिती सेननला (Kriti Sanon) देखील बसायला जागा मिळत नव्हती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


ट्रेलर लाँच कार्यक्रमाच्या वेळेस क्रितीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, क्रितीला बसायला जागा मिळत नसल्याने ट्रेलर पाहण्यासाठी ती अक्षरशः खाली बसली असल्याचे दिसून येत आली आहे. आदिपुरुष सिनेमाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमामधील क्रितीचा तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये असे दिसून आले आहे की, क्रिती ही खाली बसली आहे. क्रितीच्या या साधेपणाचं सोशल मीडियावर सध्या जोरदार कौतुक केलं जात आहे. आदिपुरुष सिनेमाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमासाठी क्रितीनं खास लूक केला होता. या कार्यक्रमासाठी तिनं व्हाईट आणि गोल्डन साडी, इअरिंग्स आणि गजरा असा ट्रेडिशनल लूक केला होता.

आदिपुरुष सिनेमाच्या ट्रेलरला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली आहे. या सिनेमाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला ‘मंगल भवन अमंगल हारी’ हे गाणं ऐकू येते. ‘ये कहानी है मेरे प्रभू श्रीराम की’ या डायलॉगनं आदिपुरुष या सिनेमाच्या ट्रेलरला सुरुवात होते. ट्रेलरमधील कलाकारांच्या डायलॉग्सनं आणि कलाकारांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. आदिपुरुष सिनेमाच्या ट्रेलरचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

राखी सावंतच्या भावाला मुंबई पोलिसांकडून अटक, 22 मे पर्यंत कोठडीत रवानगी

‘आदिपुरुष’ हा सिनेमा 16 जून रोजी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकेतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना 3D मध्ये पाहता येणार आहे. आदिपुरुष या चित्रपटात प्रभास हा रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री कृती सेनन सीता ही भूमिका साकारणार आहे. प्रभासचा ‘आदिपुरुष’ आधी 11 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण काही कारणाने या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आदिपुरुष हा चित्रपट आता 16 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Tags

follow us