Kuch Kuch Hota Hai ला 25 वर्षे पूर्ण; करणने दिलं चाहत्यांना खास गिफ्ट

Kuch Kuch Hota Hai ला 25 वर्षे पूर्ण; करणने दिलं चाहत्यांना खास गिफ्ट

Kuch Kuch Hota Hai : कुछ कुछ होता हैं (Kuch Kuch Hota Hai) या चित्रपटाविषयी 90 च्या दशकातील पीढीच्या अनेक आठवणी आहेत. तसेच या चित्रपटाने मैत्री आणि प्रेम यांच्या नव्या व्याख्या तरूणाईला दिल्या. त्यामुळे शाहरूख, काजोल आणि राणी मुखर्जी या त्रिकुटाला तरूणांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेले होते. तसेच आजही या चित्रपटाची आणि या जोडीची क्रेझ चाहत्यांमध्ये कमी झालेली नाही.

Maratha Reservation : ‘एक-दोन हजार डिझेल टाकायला देऊ का?’ जरांगे पाटलांचा भुजबळांना खोचक टोला

कुछ कुछ होता हैं ला 25 वर्ष पुर्ण…

दरम्यान कुछ कुछ होता हैं या चित्रपटाला 15 ऑक्टोबर 2023 ला 25 वर्ष पुर्ण होत आहेत. त्यानिमित्त दिग्दर्शक करण जौहर याने कुछ कुछ होता हैं च्या चाहत्यांना एक खास गिफ्ट दिलं आहे. करणसाठी देखील हा चित्रपट खास होता. कारण या चित्रपटातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. त्यामुळे आता कुछ कुछ होता हैं चे चाहते पुन्हा एकदा त्या काळात जाऊन आपल्या आठवणींना उजाळा देऊ शकणार आहे.

काय आहे हे गिफ्ट?

या चित्रपटाला 25 वर्षे पुर्ण झाले त्या निमित्त मुंबईत या चित्रपटाचे ती स्पेशल स्क्रनिंग ठेवण्यात आली आहे. त्याची घोषणा करण जौहरने सोशल मीडियावर करताच चाहत्यांनी तिकीट बुकिंगसाठी प्रयत्न केले मात्र तोपर्यंत चित्रपटाची तिकीट बुक झाले होते. तर विशेष म्हणजे चित्रपटाची तिकीट केवळ 25 रूपायांमध्ये ठेवण्यात आले होते.

Operation Ajay : भारत सरकारचे मोठे यश; युद्धग्रस्त इस्त्रायलमधून 212 भारतीय सुखरूप मायदेशात

तर करण जौहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये कुछ कुछ होता हैं या चित्रपटाचा डायलॉग लिहीलाय म्हटले आहे की, ‘हम एक बार जीते हैं, एक बार मरते हैं’ आणि कुछ कुछ होता हैं या चित्रपटाचं स्पेशल स्क्रनिंगची संधी देखील एकदाच मिळते. पीव्हिआर, मुंबई येथे 15 ऑक्टोबरला. आताच तुमचे तिकीट बुक करा.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube