अंगिरा धरने ‘माँ का सम’मध्ये कोणतच्या सर्वात मोठ्या भीतीवर मात केली ?

Maa Ka Sum-शांत गणित प्राध्यापक म्हणून त्यांचे पात्र तर्क, अंक आणि नमुन्यांच्या माध्यमातून जग पाहते आणि प्रेक्षकांची मने जिंकते.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Maa Ka Sum

Maa Ka Sum: काही भूमिका तेव्हाच अधिक रंजक ठरतात, जेव्हा त्यामागचा वैयक्तिक संबंध समोर येतो. ‘माँ का सम’ या मालिकेत अंगिरा धर (Angira Dhar) हिने साकारलेले ‘इरा’ हे पात्र पडद्यावर अत्यंत सहज दिसते. पण प्रत्यक्षात या भूमिकेने त्यांना त्यांच्या जुन्या आणि परिचित भीतीसमोर उभे केले. शांत गणित प्राध्यापक म्हणून त्यांचे पात्र तर्क, अंक आणि नमुन्यांच्या माध्यमातून जग पाहते आणि प्रेक्षकांची मने जिंकते. पण पडद्यामागे अंगिरा मात्र एक वेगळीच समीकरण सोडवत होत्या. ही भूमिका त्यांना थेट त्या भीतीकडे घेऊन गेली, जी त्यांनी बालपणी मागे सोडली होती.

गणिताशी असलेल्या आपल्या नात्याबद्दल सांगताना अंगिरा म्हणाल्या, लहानपणापासून गणित हा माझा सर्वात मोठा धाक होता. हा एकमेव विषय होता ज्यामुळे मला खरोखर तणाव जाणवत असे. मला घाम येत असे, घाबरायला होत असे आणि परीक्षेला बसणे टाळण्यासाठी मी कारणेही शोधत असे. त्यामुळे या भूमिकेमुळे त्या सगळ्या आठवणी पुन्हा समोर आल्या. चित्रीकरणादरम्यान एक प्रसंग असा आला की शेवटच्या क्षणी संवाद बदलल्यामुळे मी पूर्णपणे घाबरले. मला थोडावेळ बाजूला जाऊन परत येण्यापूर्वी श्वसनाचा सराव करावा लागला. मी यापूर्वी कोणत्याही चित्रीकरणावेळी असे अनुभवले नव्हते. ही फक्त भूमिका राहिली नव्हती, तर स्वतःसाठी पूर्ण करायचे एक आव्हान बनले होते.”

बबिता अशिवाल यांनी युनोइया फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित ‘माँ का सम’ ही भावनिक मालिका आहे. निकोलस खारकोंगोर यांनी दिग्दर्शन केले असून रविंदर रंधावा आणि सुमृत शाही यांनी लेखन केले आहे. अंगिरा धर यांच्यासोबत मोना सिंह, मिहिर आहूजा आणि रणवीर बरार प्रमुख भूमिकेत आहेत. ‘माँ का सम’ ही मालिका आता विशेषतः प्राइम व्हिडिओवर हिंदी भाषेत पाहता येते, तसेच तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांतील उपशीर्षकेही उपलब्ध आहेत.

follow us