Rio Kapadia: ‘चक दे इंडिया’ मधील सुप्रसिद्ध अभिनेता रिओ कपाडिया यांचे निधन
Rio Kapadia Passed Away: बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता रिओ कपाडिया (Rio Kapadia) यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली. ते ६६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसापासून त्यांची ‘मेड इन हेव्हन’ ही वेबसीरिज (Made in Heaven webseries) प्रदर्शित करण्यात आली होती. त्याला चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता.
जाहिरात, सिरीयल, सिनेमा, वेबसिरिज अशा अनेक माध्यमांतून त्यांनी चाहत्यांचे मनोरंजन केल्याचे बघायला मिळत होते. परंतु त्यांच्या निधनानं मनोरंजन क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे. गुरूवारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत माळवली आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
तसेच किंग खानच्या ‘चक दे इंडिया’मध्ये देखील झळकले होते. त्यांनी या सिनेमात कॉमेंट्री करणाऱ्याची भुमिका केली होती. त्यांचा चेहरा त्यामुळे कायमच ओळखीचा राहिला आहे. त्यांची ‘मेड इन हेवन 2’ वेबसिरिज मोठ्या प्रमाणात गाजली होती. यामध्ये त्यांनी अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या वडिलांचे काम केल्याचे बघायला मिळाले होते.
Manik Bhide Death: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे यांचं निधन
‘सपने सुहाने लडकपन के’, ‘कुटूंब’, ‘जुडवा राजा’, ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ अशा लोकप्रिय सिरियलमधून कामं केली होती. तसेच केएसीच्या जाहिरातीमध्ये देखील ते दिसले होते. त्यांनी चक दे इंडिया, दिल चाहता हैं, हॅप्पी न्यू इयर अशा अनेक सिनेमातून कामं केली आहेत. त्यासोबत त्यांनी आपली स्वत:ची ओळख देखील निर्माण केली होती.