‘Ashneer Groverच्या’ बायकोचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘आम्ही एकत्र आंघोळ…’

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 02T111503.044

Ashneer Grover: अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) ‘शार्क टँक’च्या पहिल्या पर्वानंतर लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाला. त्याच्या अनेक मुलाखती आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चाहत्यांमध्ये सतत चर्चेत असतो. अश्नीर आणि त्याची पत्नी माधुरीने (Madhuri Jain ) नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी त्यांची प्रेमकहाणी आणि संघर्षाबद्दल माहिती दिली आहे. सुरुवातीला दोघेही एका खोलीच्या घरात राहत होते, त्यावेळी ते अनेकदा बाथरूममध्ये एकत्र आंघोळ करत असायचे, याचा त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashneer Grover (@ashneer.grover)


अश्नीर आणि माधुरी यांनी नुकतीच आरजे अनमोल आणि अमृता राव यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. अश्नीर ग्रोवर आणि माधुरी जैन यांनी सांगितले आहे की, लग्नानंतर ते मुंबईत 1BHK फ्लॅटमध्ये राहत होते. या रोमँटिक कपलने (Romantic couple) त्या इमारतीला भेट देऊन जुन्या आठवणींना मोठा उजाळा दिला आहे. माधुरीने पुढे सांगितले आहे की, ते ज्या परिसरात राहत असायचे, तिथे आता अनेक इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत.

परिसर पूर्वीसारखा राहिला नाही. १६ वर्षांअगोदर ते दोघेही कामासाठी दिल्लीहून मुंबईला आले होते. माधुरी पुढे म्हणाली, आमच्या घरी साधं टेबल देखील नव्हता. आम्ही खाली बसून जेवण करत असायचो. आमच्या एका महिन्याच्या पगारातून आम्ही फर्निचर विकत घेतले होते. एकदा अश्नीरने लकी ड्रॉद्वारे १२ लाखांची बाइक जिंकली होती.

मी त्याला विचारले देखील होते की, बक्षिसामध्ये अजून काय आहे, तर त्याने सांगितलं की, एलसीडी टीव्हीपण आहे. मग मी अश्नीरला टीव्ही आणायला सांगितले होते. कारण मी त्याला बाइक चालवू द्यायची नाही. आम्ही मुंबईत ४८ हजार पगारावर जगत होतो. तसेच आम्ही १६ हजार रुपये भाडं द्यायचो आणि बाकीच्या पगारात सिनेमा बघायला जात असायचो.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

प्रीमियम सीट्स घेण्यासाठी आणि चांगल्या जेवणावर पैसे खर्च करत असायचो. इतकंच नाही तर, आम्ही अमेरिका आणि कॅनडाला देखील जात असायचो, कारण तेव्हा डॉलर ४० रुपयांवर होता. आमच्या घरात एकच बाथरूम होतं. कधीकधी आम्ही दोघे एकत्र आंघोळ करत असायचो. कारण एकच बाथरूम असल्याने ऑफिसला जायला उशीर होत असायचा असा धक्कादायक खुलासा आहे.

तसेच जेव्हा अश्नीर मुंबईत होता, तेव्हा तो खूप रोमँटिक होता. आम्ही फक्त अॅनिव्हर्सरी आणि वाढदिवशीच एकमेकांना सतत गिफ्ट देत असायचो, तर आम्ही नेहमी एकत्र शॉपिंग देखील करत असायचो, एकमेकांना आवडणाऱ्या वस्तू घेऊन देत असायचो, असा तिने मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

Tags

follow us