Download App

“शूटिंग दरम्यान कॅमेरा हरवला आणि मग…”; महाराष्ट्र शाहीरचे सिनेमॅटोग्राफरने सांगितला ‘तो’ किस्सा

Maharashtra Shaheer: ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात (Maharashtra Shaheer) उत्तमोत्तम दर्जेदार गाणी, भावनिक प्रसंग आणि सामाजिक-राजकीय प्रसंगांमधून सर्वांगसुंदर असलेल्या चित्रपटाचा काही भाग, गाणे प्रदर्शित झाला. प्रदर्शित होत असलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ची निर्मिती ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ आणि बेला केदार शिंदे प्रॉडक्शन्सने केली आहे. अनेक नाटकं, टीव्ही मालिका केलेल्या ज्येष्ठ लेखिका आणि दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचं लेखन केले आहेत. तर शाहिरांचेच नातू आणि दिग्दर्शक केदार शिंदे (Directed Kedar Shinde) हा चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.  आणि लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तसेच सिनेमॅटोग्राफर वासुदेव राणे (Cinematographer Vasudev Rane) हे आहेत. रंगभूमी, टीव्ही मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये केदार शिंदे यांनी दमदार काम केलं आहे. नातवानंच आपल्या आजोबांवर चित्रपट करण्याचा योग या चित्रपटामुळे जुळून आला आहे. चित्रपटात शाहिरांची आणि त्यांच्या समकालीन अशा महत्त्वाच्या व्यक्तिरेखा कोण साकारणार यावर सिनेमॅटोग्राफर वासुदेव राणे यांनी सांगण्यातचा प्रयत्न केला आहे.

‘महाराष्ट्र भूमी बहुगुणी…’ या गाण्यापासून ट्रेलरला सुरुवात होते आणि गाण्याला सुरूवात होताच अंगावर रोमांच उभे राहतात. उत्तरोत्तर चित्रपटाचा बाज ध्यानी येतो. “रुकीये मिस्टर साबळे, यु कान्ट सिंग लाईक धिस, द वर्ड महाराष्ट्र कॅनॉट कम सो मेनी टाईम्स…” असे म्हणत एका प्रसंगी शाहिरांना थांबविले जाते. त्यावर शाहीर बाणेदारपाने उत्तर देतात्त, “मग छत्रपती कुठे जन्माला आले म्हणून सांगायचे, “दिल्ली की कलकत्ता?”

शाहिरांचा बाणेदारपणा, कणखर व ठोक विचार, बंडखोर वृत्ती इतरही अनेक प्रसंगांमध्ये समोर येते. मग “म्या गानार, माझं तगडं तोडलंस तरी म्या गानार…” हे आईला दिलेलं उत्तर, एका राजकीय नेत्याला “आम्ही कलाकार आहोत कुणाचे मिंधे नाहीत,” अशी दिलेली चपराक या गोष्टी शाहिरांचे व्यक्तिमत्त्व उभे करत जातात.

त्याचबरोबर त्यांच्या प्रेयसी आणि पत्नीबरोबरचे प्रसंग त्यांच्या आयुष्यातील नाजूक कप्पा अलगद फुलवतात. एक दिवस शाहीर भानुमती यांच्याशी लग्न करून थेट घरी घेऊन येतात आणि त्यांची आई त्यांच्यावर भडकते, असा एक प्रसंग आहे. त्याशिवाय भानुमती यांचे एक सशक्त व्यक्तिमत्त्व या कथेमधून बघायला मिळणार आहे.

“माझे ठरलंय, माझे काव्य तुमचा आवाज,” असे एका प्रसंगात त्या शाहिरांना सांगत असतात. यानंतर एका प्रसंगामध्ये त्या त्यांना सांगत असतात, “तुम्हालासुद्धा कळू दे माझ्या काव्याशिवाय तुमच्यातील शाहीर कुठवर जाऊ शकतो ते…” त्यानंतर काही सामाजिक-राजकीय संवाद या ट्रेलरमध्ये साकारतात आणि शाहिरांची सामाजिक बांधिलकी समोर येत जाते.

दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानच्या पुरस्कारांची घोषणा, आशा भोसलेंना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर

तसेच सिनेमॅटोग्राफर वासुदेव राणे यांनी एक किस्सा देखील सांगितलं आहे. शूटिंगच्या दरम्यान कॅमेरा हरवल्यावर काय झालं? हे देखील सांगण्याचा चित्यास प्रयत्न त्यांनी केला आहे. तसेच ‘महाराष्ट्र शाहीर’विषयी दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की, “गेल्या अडीच वर्षं या चित्रपटाचे काम सुरु आहे. या चित्रपटातून शाहीर साबळे यांचा जीवनपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. नातू म्हणून मला ते मोठे वाटतातच. पण एक कलाकार म्हणूनही मला त्यांचं जीवन खूपच मोठं वाटतं. आपले कलाकार किती मोठे होते, आपल्या मातीतून हे कलाकार कसे घडले, त्यांनी यश कसं मिळवलं, यश मिळवणं सहजसोपं असतं का? अशा अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी नव्या पिढीला हा चित्रपट मार्गदर्शक ठरणार आहे.

शाहिरांचा जीवनप्रवास पोहचवण्यासाठी दिग्दर्शकांसहितच कलाकार सुद्धा प्रयत्न करत आहेत. शाहीर साबळे यांच्या पत्नी श्रीमती राधाबाई कृष्णराव साबळे, दिग्दर्शक केदार शिंदे, प्रमुख कलाकार अंकुश चौधरी, सना केदार शिंदे, निर्माते संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे, संगीतकार अजय-अतुल, आणि पटकथा-संवाद लेखिका प्रतिमा कुलकर्णी या सर्वांचे या चित्रपटासाठी खूप महत्वाचे व्यक्तीमत्व ठरले आहेत.

Tags

follow us