Shivali Parab: ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’तील शिवाली परबचं ‘मासोळी ठुमकेवाली’ नवीन गाणं रिलीज

Shivali Parab: ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’तील शिवाली परबचं ‘मासोळी ठुमकेवाली’ नवीन गाणं रिलीज

Shivali Parab New Song Release: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामधून चाहत्यांच्या भेटीला येणारी शिवाली परब (Shivali Parab) आता म्युझिक व्हिडीओंमधून देखील चाहत्यांचा मनोरंजन करत असल्याचे बघायला मिळत आहे. आता तिचा नवा कोरा म्युझिक व्हिडीओ चाहत्यांच्या भेटीला आला आहे. ‘मासोळी ठुमकेवाली’ (Masoli Thumkewali Song) असं तिच्या या नव्या म्युझिक व्हिडीओचं नाव असून, यातून ती धमाल करत असल्याचे दिसत आहे.

मराठी गाण्यांमध्ये कोळी गीतांचं एक अनोखं महत्त्व आहे. अनेक कोळीगीतं आज देखील संगीतप्रेमींच्या तोंडी असतात. त्यामध्ये आता आली हो मासोळी ठुमकेवाली असे शब्द असलेल्या मासोळी ठुमकेवाली या गाण्याची भर पडली आहे. उत्तम शब्द असलेलं हे गाणं प्रत्येकालाच नाचायला लावणारं आहे. यामुळे शिवालीची मासोळी ठुमकेवाली संगीतप्रेमींच्या आणि शिवालीच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरेल यामध्ये काही शंका नाही.

कायम दर्जेदार म्युझिक व्हिडीओ सादर करणाऱ्या सप्तसूर म्युझिकतर्फे ‘मासोळी ठुमकेवाली’ हा नवा म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेत्री शिवाली परब आणि अभिजित अमकर यांची जोडी या गाण्यात पाहायला मिळणार आहे. नाचायला लावणारं हे गाणं सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर बघता येणार आहे.

Main Atal Hoon: अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेसाठी पंकज त्रिपाठींनी ’60 दिवस फक्त खिचडी खाल्ली’

साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांच्या सप्तसूर म्युझिकची निर्मिती असलेल्या ‘मासोळी ठुमकेवाली’ या म्युझिक व्हिडीओचं दिग्दर्शन आणि नृत्य दिग्दर्शन कृतिक माझिरे यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. हर्ष करण आदित्य (त्रिनिती ब्रोस) यांच्या शब्दांना हर्षवर्धन वावरे, करण वावरे, आदित्य पाटेकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. कस्तुरी वावरे, आदित्य पाटेकर यांनी हे गाणं गायलं आहे. रोहन कंटक, निखिल वराडकर यांनी छायांकन केल्याचे बघायला मिळणार आहे. या गाण्यात शिवाली परब आणि अभिजित अमकर हे मराठी चित्रपट, मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात लोकप्रिय कलावंत आहेत. अंकित शिंदे आणि दिव्या घाग यांनी कार्यकारी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube