Mahima Chaudhry Mother Death : अभिनेत्री महिमा चौधरीच्या आईचं निधन

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 17T115303.047

Mahima Chaudhry Mother Death: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhry) हिच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. (Mahima Chaudhry Mother Death ) अभिनेत्री महिमा चौधरीच्या आईचं निधन झालं आहे. चार दिवसांपूर्वी त्यांचं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

आईच्या निधनाने महिमावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महिमासोबत तिची मुलगी अरियानाचीही रडून रडून वाईट अवस्था झाली. महिमाने अद्याप आईच्या निधनाबद्दल कोणतीही माहिती शेअर केली नाही. नुकतंच कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्या देखील आईचे निधन झालं. अभिनय जगतातील अनेक कलाकार त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahimachaudhry (@mahimachaudhry1)


तसेच माधुरी दीक्षितच्या आईचेही दोन- तीन आठवड्यांपूर्वी निधन झाले होते. अशातच आता महिमा चौधरीच्या आईचे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिमाची आई गेल्या काही दिवसापासून आजारी होते, आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारा दरम्यानच त्यांच्या आईचे निधन झाले आहे.

चीकू अजून लहानच, कोहलीच्या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट

महिमा गेल्या काही दिवसापासून वैयक्तिक आयुष्यात अनेक समस्यांना सामोरी जात आहे. तिला कॅन्सरचं निदान झालं होतं. २०२२ मध्ये तिने या गंभीर आजारावर मात केल्याचा खुलासा देखील केला होता.

२००७ मध्ये महिमाने एका मुलीला जन्म दिला. मात्र, तिच्या जन्मापूर्वीच बॉबी आणि महिमाच्या नात्यात दुरावा आला होता. बॉबी आणि त्याच्या एक्स पत्नीची कायदेशीर लढाई सुरु झाल्यामुळे बॉबी आणि महिमाच्या नात्यातही दुरावा आला. २०१३ मध्ये ही जोडी वेगळी झाली. या दोघांनीही घटस्फोट घेतला नाही. परंतु, ते एकत्रही राहात नाहीत.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube