Shiv Grewa: चमत्कार झाला! मृत्यूनंतर काय होतं? मरुन पुन्हा जिवंत झालेल्या कलाकाराचे काय आहेत अनुभव?
Shiv Grewal: एका 60 वर्षीय व्यक्तीने भयानक अनुभव शेअर केला आहे. ब्रिटनमध्ये स्टेज अॅक्टर म्हणून काम करत असताना त्याला एक भयंकर अनुभवायला मिळाला आहे. या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. परंतु ७ मिनिटांनंतर तो परत एकदा पहिल्यासारखा जिवंत झाला. या ७ मिनिटांच्या काळामध्ये तो नेमका कुठे होता आणि काय करत होता, याविषयी त्यांने भयानक सत्य सांगितले आहे.
या अनुभवांना आफ्टर लाइफ एक्सपीरियंस किंवा निअर डेथ एक्सपीरियंस असे देखील त्याला संबोधले जाते. शिवने त्याच्या या अनुभवाविषयी सविस्तर सांगितले आहे. ९ फेब्रुवारी २०१३ मध्ये त्याला हार्टअॅटेक आला होता. यावेळी तो लंडनमध्ये त्यांच्या घरात बायकोबरोबर लंच करत होता. जेव्हा त्याना हार्टअॅटेकचा झटका आला, त्यावेळेस त्यांच्या बायकोने एलिसनने रुग्णवाहिकेला फोन केला होता. परंतु तोपर्यंत या गोष्टीला खूप उशीर झाला होता. शिवचा मृत्यू झाला होता. त्यांना वेळेत उपचार देखील मिळाले नव्हते.
परंतु त्यांच्या मृत्यूनंतर ते पुन्हा जिवंत होतील असं कोणालाच वाटलं नाही. न्यूयॉर्क साइटमध्ये त्यांच्या या अनुभवाविषयी सांगण्यात आले आहे. शिवने सांगितले आहे की, मला कळलं होतं की माझा मृत्यू झाला आहे. माझ्या शरीरातून सगळं काही हळूहळू निसटत जात आहे, याची जाणीव मला होत होती. हा अनुभव शब्दांत मांडण्यात येत नाही. मला असं देखील वाटतं होतं की मी झिरो होत जात आहे.परंतु मी अजून देखील भावना आणि संवेदना अुनभवू शकतो.
Subhedar Review: गनिमा कावा करणाऱ्यांकडून आत्मविश्वास शिकवणारा ‘सुभेदार’
मला पाण्यामध्ये पोहोत असल्यासारखं वाटत होतं. तुम्ही निवांत आहात आणि जगापासून खूप लांब आहेत. यावेळी तर मी चंद्रावर फेरफटका मारत होतो आणि पूर्ण अंतराळ पाहतोय, अशी जाणीव मला हळूहळू होत होती. शिव यांनी पुढे म्हणाला की, जीवन आणि पुनर्जन्म हे पूर्ण माझ्या आजूबाजूला फिरत होत. परंतु मला हे सगळं नको होतं. मला पुन्हा माझ्या विश्वामध्ये परत जायचं होतं. मला माझे शरीर हवे होते. माझी बायको माझी वाट बघत होती. मला आणखी जगायचे होते. यानंतर माझ्या घरी रुग्णवाहिका आली आणि डॉक्टरांना पुन्हा माझ्या हृदयाचे ठोके सुरु करण्यात यश आल्याचे त्याने यावेळी सांगितलं.
तसेच माझ्यावर एक शस्रक्रियादेखील करण्यात आली. एकदा मरण अनुभवल्यावर आता आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टीकोनच संपूर्णपणे बदलला आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच मी आता मरणाला आजिबात घाबरत नाही. परंतु त्याचसोबत मी जास्त भयभीत आहे. कारण मला आता हे उमगलंय की माझ्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते किती महत्वाचा भाग आहे. मी इथे जन्म घेण्यासाठी मनापासून अभार मानतो.