Bhaiyaa Ji : अब निवेदन नही…! मनोज वाजपेयींच्या ‘भैय्याजी’चा जबरदस्त टिझर रिलीज

Bhaiyaa Ji : अब निवेदन नही…! मनोज वाजपेयींच्या ‘भैय्याजी’चा जबरदस्त टिझर रिलीज

Bhaiyaa Ji Teaser Release: मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) सध्या त्याच्या आगामी ‘भैया जी’ (Bhaiyaa Ji Movie) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत, या सिनेमाचे दिग्दर्शन अपूर्व सिंग कार्कीकडे सोपवण्यात आले आहे. हा चित्रपट अधिक खास ठरणार आहे. (Social Media) कारण या माध्यमातून मनोज निर्माता म्हणून आपली नवी इनिंग सुरू करणार आहे. अभिनेत्यासोबतच त्याची पत्नी शबाना रझा (Shabana Raza) देखील या चित्रपटाची निर्माती असणार आहे. आता ‘भैय्या जी’चा धमाकेदार टीझर रिलीज (Bhaiyaa Ji Teaser Release) करण्यात आला आहे, यामध्ये मनोजचा डॅशिंग अवतार पाहायला मिळत आहे.

मनोजच्या ‘भैय्या जी’ची रिलीज डेट जाहीर: मनोज बाजपेयी यांनी आज त्यांच्या आगामी ‘भैया जी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. मनोज बाजपेयी यांचा हा चित्रपट 24 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून 20 मार्च रोजी दुपारी त्याचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करून याची घोषणा करण्यात आली. मनोजने अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट करताना लिहिले आहे की, “वो आला.” चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना त्यांनी पुढे लिहिले की, “भैयाजी 24 मे रोजी थिएटरमध्ये. हा टीझर 20 मार्च रोजी दुपारी 2:42 वाजता रिलीज होणार आहे.

मनोज एका गावकऱ्याच्या स्टाईलमध्ये : नवीन पोस्टरमध्ये मनोज एका सामान्य गावकऱ्याच्या गेटअपमध्ये दिसत आहे. तो कुर्ता-धोतर आणि टॉवेल घातलेला दिसत आहे, तर त्याच्या तोंडात सिगारेट आणि कपाळावर रक्ताची रेघ आहे. पार्श्वभूमी काही निषेधाची असावी असे वाटते. विशेष म्हणजे या चित्रपटातून मनोज निर्माता म्हणून पदार्पण करणार आहे. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शबानाही या चित्रपटाची निर्माती असणार आहे.

Mylek Movie: ‘असताना तू’ या गाण्यातून उलगडणार ‘मायलेकी’ची मैत्री

मनोज बाजपेयीची आघाडी: मनोजचा ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा सिनेमा खूपचं गाजला. शिवाय मनोज ‘झोरम’ आणि ‘किलर सूप’मध्येही दिसला होता. आता त्याच्याकडे ‘द फॅमिली मॅन’ चा पुढचा हप्ता पाइपलाइनमध्ये आहे. सध्या अभिनेता त्याच्या आगामी ‘भैय्या जी’ या चित्रपटासाठी उत्सुकता लागली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube