आईच्या वाढदिवशी सिद्धार्थ चांदेकरने केली खास पोस्ट; निवांत बसल्याचा फोटो शेअर करताना म्हणाला…

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 11T122841.902

Siddharth Chandekar Post : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ( Siddharth Chandekar ) सोशल मीडियावर सतत नवीन व्हिडिओ असतील किंवा फोटो शेअर करत असतो. तो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत येतो. त्याने त्याच्या अभिनयामुळे चाहत्यांची मने नेहमीच जिंकली आहेत. सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर यांचा आज वाढदिवस आहे. (instagram ) त्यानिमित्ताने त्याने एक खास पोस्ट लिहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)


सिद्धार्थ चांदेकर हा सोशल मीडियावर (Social media) प्रचंड सक्रीय असतो. त्याने आईच्या वाढदिवसानिमित्त तिचा एक खास फोटो पोस्ट (Photo Post ) केला आहे. यामध्ये त्याची आई ही झोक्यावर निवांत बसल्याचे बघायला मिळत आहे. या फोटोला सिद्धार्थने छान कॅप्शन देखील दिले आहे.

“वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. कायम असंच निवांत बघायच आहे तुला. कुठला विचार नाही, त्रास नाही. हातात एक कडक चहाचा कप आणि चेहऱ्यावर कधीही न उतरणारं हसू. बास!”, असे मस्त कॅप्शन त्याने आईच्या पोस्टला दिली आहे. सिद्धार्थ चांदेकरच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी खूप छान कमेंट केल्या आहेत.

Akshay Kumar : 55 वर्षीय खिलाडीला शर्टलेस होऊन डान्स करणं पडलं महागात; व्हिडीओ पाहून चाहते भडकले

अभिनेत्री अमृता खानविलकरने सिद्धार्थच्या पोस्टवर कमेंट करत ‘काकू वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असे म्हटले आहे. तर मंजिरी ओकने ‘सीमा ताई, वाढदिवसाच्या शुभेच्छा’ अशी कॉमेंट्स केले आहेत. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा काकू’, असे क्षितीज पटवर्धनने देखील कॉमेंट्स पास केली आहे. दरम्यास सिद्धार्थची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने या पोस्टची चांगलीच चर्चा होत आहे.

Tags

follow us