आपल्या मातीतल्या माणसांची गोष्ट… कान्समधील अभिमानास्पद क्षणांबाबत छाया कदमांची भावूक पोस्ट

आपल्या मातीतल्या माणसांची गोष्ट… कान्समधील अभिमानास्पद क्षणांबाबत छाया कदमांची भावूक पोस्ट

Marathi Actress Chhaya Kadam Emotional Post on Cannes 2024 : सध्या फ्रान्समध्ये प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival) जोरात सुरू आहे. (Cannes 2024) त्यात यंदाचं वर्ष भारतासाठी ( Indian Films ) खास ठरलं आहे. कारण Cannes 2024 मध्ये तीस वर्षांनंतर भारतीय चित्रपटाचा ठसा उमटला आहे. त्यात मराठमोळी अभिनेत्री छाया कदम ( Chhaya Kadam ) यांनी देखील हजेरी लावली होती. त्यांचा चित्रपट ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’ चा प्रिमियर या सोहळ्यात झाला. त्याला स्टॅन्डिंग ओव्हेशन देखील मिळाले.

कान्स 2024 मध्ये भारताचा डंका! तीस वर्षांनंतर मुख्य स्पर्धा विभागात भारताचा ठसा उमटवला

तर पायल कापाडीआ यांच्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’ या चित्रपटात कदम यांनी महत्त्वाची भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटाला मुख्य स्पर्धा विभागात ग्रान प्री पुरस्कार मिळाला. आपल्या या यशाबद्दल छाया कदम यांनी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या की, आपल्या मातीतल्या आपल्या माणसांची गोष्ट आपल्या वाटेला येते तेव्हा, तिच्यात जीव ओतून टाकलेला एक एक क्षण जेव्हा कान्स फिल्म फेस्टीवल उजाळून टाकतो.

तेव्हा आपल्या मागच्या सगळ्या प्रवासातल्या सगळ्या सिनेमांची – लेखकांची आणि दिग्दर्शकांची आठवण येते. कारण त्यांनी त्या त्या वेळेस माझ्यावर दाखवलेल्या विश्र्वासामुळेच, एक एक पाऊल पुढे पडत हा प्रवास इथ पर्यंत येऊन पोहचला आहे. माझ्या आजवरच्या प्रवासातल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. की तुमच्यामुळे आज ही छाया इथवर पोहचली आहे. खूप समाधान – आनंद आणि मन भरून आले. असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

धंगेकरांना भलताच आत्मविश्वास; संसदेत भाषणासाठी इंग्रजीचा क्लास ही लावणार

त्याचबरोबर फिल्म स्कूल्ससाठी असलेल्या लघुपटस्पर्धेत चिदानंद नाईक याची ‘द सनफ्लॅावर्स वर द फर्स्ट टू नो…’ ही एफटीआयआयची निर्मिती असलेली शॅार्ट फिल्म विजेती ठरली. त्याचबरोबर बल्गेरिअन दिग्दर्शक कॅान्स्टॅन्टीन बोयानोव च्या ‘द शेमलेस’ या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल अनुसूया सेनगुप्ताला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. भारतीय अभिनेत्रीला हा पुरस्कार प्रथमच मिळाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज