‘Khupte Tithe Gupte: वंदना गुप्तेंनी ‘पाडाला पिकला आंबा गाण्या’चा सांगितला किस्सा, “सासूबाईंसमोर…”

‘Khupte Tithe Gupte: वंदना गुप्तेंनी ‘पाडाला पिकला आंबा गाण्या’चा सांगितला किस्सा, “सासूबाईंसमोर…”

Khupte Tithe Gupte: संगीतकार अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या हटके कार्यक्रमात कला, राजकारण अशा अनेक क्षेत्रामधील लोक हजेरी लावत असताना दिसून येत असतात. आता ‘खुप्ते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांनी हजेरी लावणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)


नुकताच ‘खुप्ते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. या प्रोमोमध्ये असे दिसून येत आहे की, वंदना गुप्ते या डान्स करत ‘खुप्ते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या मंचावर एन्ट्री मार्ट असताना दिसून येत आहेत. त्यानंतर त्या एक मजेशीर किस्सा सांगतात. त्या म्हणातात की, “मला जेव्हा शिरीषनं म्हणजेच त्यांच्या नवऱ्याने प्रपोज केलं, तेव्हा मी तिच्या कुटुंबाला भेटायला त्याच्या घरी गेले होते. माझ्या सासूबाईंनी मला त्यावेळेस विचारले होते की, गाणं म्हणशील का? तेव्हा मी पाडाला पिकलाय आंबा हे गाणं गायलं. तेव्हा माझा होणारा नवरा तिथे बसला होता. तेव्हा त्यानं जी मान खाली घातली होती ती अजून वर काढली नसल्याचा किस्सा त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

वंदना गुप्ते यांच्या ‘बाई पण भारी देवा’ या सिनेमाला चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे. या सिनेमात वंदना गुप्ते यांच्याबरोबर रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), सुकन्या मोने (Sukanya Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा परब (Deepa Parab) या अभिनेत्रींनी बाईपण भारी देवा या सिनेमात मुख्य भूमिका साकारत असताना दिसून आले आहेत.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मराठमोळी अभिनेत्रीची लूट? Rujuta Deshmukhने नितीन गडकरींना टॅग करत म्हणाली…

आता वंदना गुप्ते या ‘खुप्ते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमामध्ये कोणकोणते किस्से सांगणार आहेत? याकडे अनेकांचे लक्ष लागल्याचे पाहायला मिळत आहे. खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे या कलाकारांनी आतापर्यंत हजेरी लावली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube