मराठमोळा धुरंधर सोशल मीडिया वर होतो ट्रेंड; शिव ठाकरे धुंवाधार गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला

Shiv Thakare :  आपला माणूस म्हणून अशी ओळख असलेला अभिनेता शिव ठाकरे नुकतंच एक दमदार धुंवाधार गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Shiv Thakare

Shiv Thakare :  आपला माणूस म्हणून अशी ओळख असलेला अभिनेता शिव ठाकरे नुकतंच एक दमदार धुंवाधार गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जगभरात गाजलेल्या धुरंधर गाण्याचं मराठी व्हर्जन असलेलं ” मी धुरंधर” हे गाणं सारेगम मराठी च्या यूट्यूब आणि सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालताना दिसतंय. गाण्याचं मुख्य आकर्षण म्हणजे सगळ्यांचा लाडका आपला माणूस शिव ठाकरे या गाण्यात दिसतोय आणि मी धुरंधर हे गाणं शिव सोबत चित्रित झालं असून सध्या सोशल मीडिया हे ट्रेंड होतोय.

कुस्तीच्या आखाड्यात शिवचा (Shiv Thakare) रुबाबदार आणि दमदार अंदाज या गाण्यात बघायला तर मिळतोय पण धुरंधर गाण्याप्रमाणे त्याचं मराठी व्हर्जन देखील चर्चेचा विषय ठरतोय. सारेगम मराठी नेहमीच वैविध्यपूर्ण गाणी नव्या ट्रेंडिंग अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

मी धुरंधर (Mi Dhurandhar) गाण्याबद्दल बोलताना शिव ठाकरे सांगतो ” ज्या गाण्याने सगळे वर्ल्ड रेकॉर्ड तोडले जगभरात ट्रेंड होऊन ज्या गाण्याचं कौतुक झालं अश्या धुरंधरच मराठी व्हर्जन असलेल्या मी धुरंधर हे गाणं आपल्याला करायचं हे समजल्यावर थोड दडपण आलं होत पण या गाण्याचं आपलं मराठमोळं ट्विस्ट असलेलं गाणं करण्याची संधी मला या निमित्तानं मिळाली. कुस्तीच्या आखाड्यात आपली मराठी संस्कृती जपून हे मराठमोळं गाणं शूट करताना माझ्या अंगावर शहारे आले होते. आपली संस्कृती जपून मला मी धुरंधर हे गाणं करायला मिळालं याचा जास्त अभिमान आहे” मराठमोळं मी धुरंधर सोशल मीडियावर ट्रेंड धुमाकूळ घालत असताना पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांना आपलं काहीतरी देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आणि तो यशस्वी देखील ठरला.

एक फ्लॅट, दोन कुटुंब आणि तुफान राडा! ‘सुपर डुपर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित-

follow us