‘मर्दानी 3’ ओटीटीवरही सुपरहिट; नेटफ्लिक्स इंडियावर नंबर 1, फ्रेंचायझीतील तिन्ही चित्रपट टॉप 10 मध्ये ट्रेंड!
'मर्दानी 3' चित्रपट ओटीटीवरही सुपरहिट चित्रपट ठरला, तर नेटफ्लिक्स इंडियावर नंबर 1 तर फ्रेंचायझीतील तिन्ही चित्रपट टॉप 10 ट्रेंडमध्ये आले आहेत.
Mardani 3 Movie : यश राज फिल्म्सचा सुपरहिट चित्रपट मर्दानी 3 चित्रपट ओटीटीवरही सुपरहिट चित्रपट ठरला असून नेटफ्लिक्स इंडियावर नंबर 1 सह फ्रेंचायझीतील तिन्ही चित्रपट टॉप 10 ट्रेंडमध्ये आलेले आहेत. या चित्रपटात ज्यामध्ये राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही मोठा हिट ठरत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स इंडियावर नंबर 1 चित्रपट ठरला आहे.
‘मर्दानी 3’ (2026) नंबर 1 स्थानावर आहे, पहिला ‘मर्दानी’ (2014) नंबर 5 वर आणि ‘मर्दानी 2’ (2019) नंबर 7 वर नेटफ्लिक्स इंडियावर ट्रेंड होत आहेत — ही या अत्यंत गाजलेल्या फ्रेंचायझीसाठी मोठी कामगिरी आहे, जी देशातील एकमेव यशस्वी महिला-केंद्रित फिल्म फ्रेंचायझी आहे. ‘मर्दानी 3’ ने भारतात 53 कोटींहून अधिक नेट कलेक्शन करत फ्रेंचायझीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. तसेच, या चित्रपटाने थिएटरमध्ये 50 दिवस पूर्ण केले आहेत, जे आजच्या काळात अत्यंत दुर्मिळ यश मानले जाते.
ओपनिंग दिवशी ‘मर्दानी 3’ ने सर्व अपेक्षा पार करत मर्दानी फ्रेंचायझी आणि राणी मुखर्जीच्या सोलो चित्रपटासाठी सर्वात मोठी ओपनिंग नोंदवली. पहिल्याच दिवशी 4 कोटींची कमाई करत महिला-केंद्रित चित्रपटांसाठी दमदार सुरुवात केली होती. इंडस्ट्री विश्लेषकांच्या मते, ‘मर्दानी’ चित्रपटांभोवती वाढत असलेली चर्चा थिएटर रिलीज आणि ओटीटी प्लॅटफॉर्ममधील वाढत्या समन्वयाचे उदाहरण आहे. मजबूत वर्ड-ऑफ-माउथ आणि समीक्षकांची प्रशंसा मिळालेल्या चित्रपटांना ओटीटीवर दीर्घकाळ प्रेक्षक मिळत राहतात. या फ्रेंचायझीचे यश हे देखील सिद्ध करते की दमदार कथा आणि प्रभावी महिला भूमिकांवर आधारित भारतीय चित्रपटांना स्थानिक तसेच जागतिक स्तरावर मोठी मागणी आहे.
‘मर्दानी’ फ्रेंचायझी ही उत्कृष्ट कथाकथन आणि प्रेक्षकांशी असलेल्या नात्याचा बेंचमार्क ठरली आहे आणि भारतीय सिनेमातील सर्वात प्रभावी मालिकांपैकी एक म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. दिग्दर्शक अभिराज मीनावाला आणि निर्माता आदित्य चोपड़ा यांच्या नेतृत्वाखाली ‘मर्दानी 3’ या फ्रेंचायझीची सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि प्रभावी कथाकथनाची परंपरा पुढे नेत आहे. ‘मर्दानी’ ही आता 12 वर्षांपासून एक सिद्ध थिएट्रिकल प्रॉपर्टी बनली आहे, विशेषतः अशा प्रकारात जिथे पारंपरिकरित्या पुरुष कलाकारांचे वर्चस्व राहिले आहे.
राणी मुखर्जीने आपल्या करिअरच्या 30 व्या वर्षात पुन्हा एकदा सोलो थिएट्रिकल यश मिळवले आहे. जे तिच्या दीर्घ कारकिर्दीचे आणि बॉक्स ऑफिसवरील सातत्यपूर्ण विश्वासार्हतेचे दुर्मिळ उदाहरण आहे. या शानदार यशासह ‘मर्दानी’ मालिकेने हिट चित्रपटांची हॅटट्रिक पूर्ण केली आहे आणि ती भारतातील एकमेव यशस्वी महिला-केंद्रित फ्रेंचायझी तसेच भारतीय सिनेमाच्या इतिहासातील एकमेव हिट महिला-पोलिस फ्रेंचायझी ठरली आहे.