मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता! वर्षा उसगावकरांना पराभवाचा धक्का
All India Marathi Film Corporation Election मध्ये मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता आली आहे.
Meghraj Raje Bhosale’s single-handed power over the All India Marathi Film Corporation Election Varsha Usgaonkars defeat : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक (Election) रविवारी दि. 7 जून ला मुंबईत शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. मुंबई सोबत पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर या विभागांत हे मतदान झाले असून महामंडळाच्या 3403 मतदारांपैकी 1698 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.
शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 719 अंकांनी घसरला; नेमकं कारण काय?
यानंतर आत सोमवारी 8 जून रोजी या निवडणुकीचा निकल जाहीर झाला आहे. यामध्ये मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता आली आहे. त्यांच्या समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. तर वर्षा उसगावकरांना पराभवाचा धक्का बसला आहे.
मोदी सरकारविरोधात इंडिया आघाडी मैदानात; दिल्लीत बैठक संपन्न, महत्वाचे पाच मुद्दे ठरले
मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणाऱ्या समर्थ पॅनेलमध्ये सुनील महाजन, दीपक कदम, अजित शिरोळे, राज काझी, सुशांत शेलार, धनाजी यमकर, सुभाष नकाशे, शरद चव्हाण, प्रवीण पाटील, चैत्राली डोंगरे, रवींद्र गावडे, गणेश गारगोटे, विकास तोरणे या सर्व उमेदवारांचा समावेश होता. या सर्व उमेदवारांनी विजय मिळवत समर्थ पॅनेलचा संपूर्ण पॅनेल निवडून आणला. या निकालामुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात पुढील पाच वर्षांसाठी समर्थ पॅनेलच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीकडे सूत्रे जाणार असून, महामंडळाच्या विकासासाठी आणि चित्रपट क्षेत्रातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी नव्या जोमाने काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
पक्षनेत्याला विचारून भूमिका मांडा गावागावांत खडे फोडून…बच्चू कडूंना बावनकुळेंनी सुनावलं
विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मेघराज राजेभोसले म्हणाले, “निवडणुकीच्या काळात विरोधी पॅनेलकडून आमच्यावर अनेक बेछूट आरोप करण्यात आले. मात्र आजच्या निकालातून महामंडळाच्या सभासदांनी ते सर्व आरोप स्पष्टपणे नाकारले असून, गेल्या दहा वर्षांत आम्ही केलेल्या कामावर विश्वास व्यक्त केला आहे. हा विजय आमच्या कार्याची पावती आहे. सभासदांनी दाखविलेल्या या विश्वासामुळे त्यांच्यासाठी अधिक समर्पितपणे आणि जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. महामंडळाच्या सर्व सभासदांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. पुढील काळातही सर्व घटकांना सोबत घेऊन महामंडळाच्या विकासासाठी आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध राहू.” विजयानंतर समर्थ पॅनेलच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत सदस्यांचे आभार मानले. महामंडळाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन पारदर्शक, विकासाभिमुख आणि सर्वसमावेशक कामकाज करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.