मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले; असं असणार नवं कार्यकारी संचालक मंडळ

Meghraj Rajebhosale President of Marathi Chitrapat Mahamandal मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता आली आहे.

Meghraj Rajebhosale President Of Marathi Chitrapat Mahamandal

Meghraj Rajebhosale appointed President of Marathi Chitrapat Mahamandal new executive board : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक (Election) रविवारी दि. 7 जून ला मुंबईत शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. मुंबई सोबत पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर या विभागांत हे मतदान झाले असून महामंडळाच्या 3403 मतदारांपैकी 1698 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर आत सोमवारी 8 जून रोजी या निवडणुकीचा निकल जाहीर झाला.

जळगाव ते छत्रपती संभाजीनगर द्रुतगती महामार्गाचे सर्वेक्षण पूर्ण; एकूण लांबी सुमारे १०५ किलोमीटर

यामध्ये मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता आली आहे. त्यांच्या समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर आता मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब झालं आहे.

अमेरिका-इराण डील झाली पण हॉर्मुजमधून जहाजांनी जाणं जोखमीच; BIMCO ने का दिला अलर्ट?

त्याचबरोबर या महामंडळाची 2026-27 ते 2031-32 या काळातील नवं कार्यकारी संचालक मंडळ देखील जाहीर करण्यात आलं आहे. ते कसं असणार जाणून घ्या सविस्तर…

– अध्यक्ष मेघराज राजेभोसले
– उपाध्यक्ष (कोल्हापूर) धनाजी यमकर
– उपाध्यक्ष (मुंबई) आनंद शिंदे
– प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार
– खजिनदार सुनील महाजन
– सहकार्यवाह दीपक कदम
– सहकार्यवाह प्रवीण पाटील ऊर्फ वासू पाटील
– सहखजिनदार शरद चव्हाण
– विजय खोचीकर, संचालक
– चैत्राली डोंगरे, संचालिका
– रवींद्र गावडे, संचालक
– सुभाष नकाशे, संचालक
– राज काझी, संचालक
– वर्षा उसगावकर, संचालिका
– अजित शिरोळे, संचालक
– गणेश गारगोटे , संचालक
– विकास तोरणे, संचालक

follow us