Munjya OTT: ‘मुंज्या’ ओटीटीवर प्रदर्शित होणार; कधी, कुठे पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

Munjya OTT: ‘मुंज्या’ ओटीटीवर प्रदर्शित होणार; कधी, कुठे पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

Munjya OTT Release: सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) ॲक्शन चित्रपट नव्हे तर हॉरर चित्रपटांचे वर्चस्व आहे. आधी ‘स्त्री’, मग ‘सैतान’ आणि आता ‘मुंज्या’. ‘मुंज्या'(Munjya OTT) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले आहेत आणि चित्रपटगृहांमध्ये अजूनही त्याची पकड कायम आहे. हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. मुंज्याने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवले आहे आणि आता चाहते ओटीटीवर रिलीज होण्याची प्रतीक्षा करू शकत नाहीत. मुंज्याच्या ओटीटी रिलीजबाबत एक अपडेट समोर आले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘मुंज्या’ कधी आणि कुठे रिलीज होणार चला तर मग जाणून घेऊया..

मुंज्या हा खूपच लहान बजेटचा चित्रपट आहे आणि त्याने आपले बजेट आरामात पूर्ण केले आहे आणि त्यापेक्षाही जास्त कमाई केली आहे. या चित्रपटात शरवरी वाघ, अभय आणि मोना सिंग मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात वरुण धवनचाही एक कॅमिओ आहे.

मुंज्या कधी आणि कुठे रिलीज होणार? 

मुंज्या हा हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर, चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला कलेक्शन करत आहे, म्हणून निर्मात्यांनी तो रिलीज झाल्यानंतर दोन महिन्यांनी ओटीटीवर प्रदर्शित करण्याची योजना आखली आहे. म्हणजेच ऑगस्टमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मने अद्याप याची माहिती देण्यात आली नाही. फक्त डिस्ने प्लस हॉटस्टार रिलीजची अचूक तारीख देण्यात येणार आहे.

Munjya: ‘मुंज्या’ ची बॉक्स ऑफिसवर जादू; पहिल्याच आठवड्यात एवढी कमाई

चंदू चॅम्पियनही मागे राहिला

शर्वरी आणि अभयच्या या चित्रपटाने कार्तिक आर्यनच्या चंदू चॅम्पियनला मागे टाकले आहे. मुंज्याला इतका चांगला प्रतिसाद मिळाला आहे की चंदू चॅम्पियनलाही आपले स्थान निर्माण करण्यासाठी झगडावे लागले आहे. बिग बजेट चंदू चॅम्पियनलाही मुंज्यासमोर उभे राहणे कठीण जात आहे. मुंज्या पाहिल्यानंतर त्याचा दुसरा भागही लवकरच येईल, अशी आशा चाहत्यांना आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज