Nagraj Manjule: सत्य घटनेवर आधारीत, नागराज मंजुळेंची ‘खाशाबा’ चित्रपटाची पहिली झलक!

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 21T143504.617

Nagraj Manjule Announce New Marathi Movie Khashaba: महाराष्ट्राचा लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या आगामी ‘खाशाबा’ (Khashaba) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे.

आता या चित्रपटाचं पोस्टर आऊट करण्यात आले आहे. हा चित्रपट खेळांवर आणि खेळांडूंवर आधारित असलयाचे सांगितले जात आहे. अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. बॉक्स ऑफिसवर देखील आपली जादू दाखवण्यात हे चित्रपट यशस्वी ठरले आहेत. महाराष्ट्राचा लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘खाशाबा’ हा चित्रपट क्रीडाविषयक चित्रपट आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aatpat (@aatpatproduction)


पैलवान खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. नाजराज मंजुळे यांनी ‘खाशाबा’ या चित्रपटाचं पोस्टर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करत त्यांनी कॅप्शन लिहिले आहे की, ऑलम्पिक इतिहासात देशाचे आणि महाराष्ट्राचे नाव गौरवाने नोंदवणाऱ्या अत्यंत प्रतिभावंत पहिलवान खाशाबा जाधवांच्या आयुष्यावर मला चित्रपट करायला मिळत आहे, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.

नागराज मंजुळे यांनी पुढे सांगितले देखील आहे. फॅन्ड्री’, ‘सैराट’नंतर ‘खाशाबा’ हा माझा तिसरा मराठी चित्रपट असणार आहे, जो मी दिग्दर्शित करत आहे. जिओ स्टुडिओ, ज्योती देशपांडेंबरोबर ही माझी पहिली आणि मोठी फिल्म आहे. निखिल साने सर फॅन्ड्रीपासून जवळ आहेत. या चित्रपटाचा प्रवास नक्कीच रंजक आणि गंमतीशीर असणार आहे.

विजयानंतर दामलेंचं रंगकर्मी नाटक समूह पॅनल शरद पवारांच्या भेटीला!

नागराज मंजुळे यांच्या आगामी ‘खाशाबा’ या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या पोस्टवर खाशाबा जाधव यांच्या फोटोत तडे पडलेली फ्रेम दिसत असल्याचे वाटत आहे. तसेच मेडलने त्यांचा संपूर्ण चेहरा देखील झाकलेला दिसत आहे. नागराज मंजुळे यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर खूप खूप शुभेच्छा अण्णा, चांगभलं, विषय हार्ड अशा कमेंट्स करण्यास चाहत्यांनी सुरु केले आहे.

खाशाबा जाधव हे एक कुस्तीपटू होते. देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. खाशाबा हे एकमेव भारतीय ऑलिम्पिक पदक विजेते आहेत, ज्यांना पद्म पुरस्कार मिळाला नाही. भारत सरकारने खाशाबा यांना कुस्तीमधील त्यांच्या योगदानाबद्दल मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले.

Tags

follow us