Naal 2: “मी चाललो माझ्या खऱ्या आईला भेटायला…,” चैत्याचा नाळ 2 ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Naal 2: “मी चाललो माझ्या खऱ्या आईला भेटायला…,” चैत्याचा नाळ 2 ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Naal 2 Teaser 2 Date Out: ‘ए आई मी खेळाले जाऊ का?’ असं म्हणत आपल्या निरागस चेहऱ्याने आणि गोंडस अभिनयाने (Naal 2) अवघ्या प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारा ‘चैत्या’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Marathi Movie) लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या बहुप्रतीक्षित ‘नाळ 2’ (Naal 2) या सिनेमाचा अधिकृत टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. नागराज मंजुळे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया (Social media) अकाऊंटवर ‘‘नाळ 2’चा  सिनेमाचा दुसरा टीझरचा व्हिडीओ शेअर करत सिनेमा 10 नोव्हेंबर दिवशी येणार असल्याची माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Music Marathi (@zeemusicmarathi)


नागराज मंजुळे यांनी गेल्या वर्षीच ‘नाळ 2’ या सिनेमाची घोषणा केली होती. सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर करत त्यांनी या सिनेमाची घोषणा केली होती. बरोबर एका वर्षानंतर त्यांनी या सिनेमाचा टीझर रिलीज करून सगळ्यांनाच एक सुखद धक्का दिला होता. या टीझरमध्ये आता प्रेक्षकांना मोठ्या चैत्यनसह एक सुंदर निसर्गरम्य परिसर देखील पाहायला मिळाला आहे. ‘मी माझ्या खऱ्या आईकडे चाललो’, असं म्हणून निघून गेलेला चैतन्य आता खरंच त्याच्या आईकडे पोहोचला आहे ‘नाळ 2’ या सिनेमाचा टीझर अतिशय सुरेख आहे. टीझर पाहून आता प्रेक्षकांची आतुरता आणखी वाढली.

‘नाळ 2’ या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांना आधी ‘नाळ’ची पार्श्वभूमी दाखवतो. लहानगा चैतन्य आपल्या बालमैत्रीणीला निरोप द्यायला आला आहे. मी माझ्या खऱ्या आईकडे चाललो, आता परत कधीच येणार नाही, असं म्हणून तो पुढच्या प्रवासाला निघालेला दिसला आहे. तर, दुसऱ्या दृश्यामध्ये निसर्गरम्य घाटांमधून पावसाळी वातावरणात एसटी महामंडळाची ‘लालपरी’ जाताना दिसली आहे. तर, त्यातून एक लहानगा हात पाऊस झेलण्यासाठी बाहेर आला आहे. तर, मागून आईचा हात आपल्या पिलाला पावसापासून वाचवण्यासाठी पुढे आला आहे. याच दृश्यात चैत्याची झलक दिसली आहे.

Aamir Khan: आमिर खान मुंबईला रामराम ठोकणार? नेमकं प्रकरण काय?

‘नाळ 2’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करत या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख देखील आता जाहीर करण्यात आली आहे. हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे 10 नोव्हेंबर 2023 दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नाळ २’मधून पुन्हा एकदा ‘चैत्या’ म्हणजेच श्रीनिवास पोफळे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube