Nagraj Manjule: राष्ट्रीय पुरस्कार चोरीला, नागराज मंजुळेंनी केला खुलासा; म्हणाले …

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 08T172630.423

Nagraj Manjule National Award theft: मुंबई मराठी चित्रपटसृष्टीला सातासमुद्रापार नेणारे दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी आपल्या चित्रपटांतून समाजभान जपले आहे. त्यांचा प्रत्येकच चित्रपट मोठ्या पडद्यावर हिट ठरत आहे. (National Award) सिनेमा हे समाजामधील वास्तविक चित्र दाखवण्याचे योग्य माध्यम आहे, हे त्यांनी जगाला पटवून दिले आहे. यामुळेच अनेक नव्या कलाकारांनी आणि दिग्दर्शकांनी सिनेसृष्टीमध्ये नव्याने उभं राहण्याची हिंमत दाखवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by IMDb India (@imdb_in)


अनेक गंभीर सवालावर आपल्या चित्रपटातून भाष्य करणाऱ्या नागराज यांच्या घरी एकदा चोरी झाली होती. मात्र ती अशी तशी चोरी नव्हती. तर चोरांनी घरात कुणी नाही हे बघून डल्ला तर मारला होता. मात्र काय चोरून नेलं असेल तर तो नागराज यांना मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार (National Award). आता नागराज मंजुळें यांनी यावर खुलासा केला आहे.

‘सैराट’, ‘फॅन्ड्री’ आणि ‘झुंड’ या चित्रपटांच्या अगोदर नागराज यांना खरी ओळख मिळाली असेल तर त्यांच्या ‘पिस्तुल्या’ या शॉर्टफिल्ममुळे. त्यांच्या या शॉर्टफिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तेव्हा त्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी कौतुक केले होते. या गोष्टीची प्रचंड चर्चा झाली. कदाचित ही चर्चा ऐकून चोरांनी चक्क पुरस्कारच चोरून नेला आहे.

Uorfi Javed Saree Look: उर्फी जावेदचं साडीत खुललं सौंदर्य, मोहक अंदाज पाहून चाहतेही झाले फिदा

त्या दिवशी नागराज ‘फॅन्ड्री’ चित्रपटाचे शूटिंग करत होते. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी त्यांची आई आणि भाऊ दोघेही सेटवर आले होते. याचा फायदा त्यांनी घेतला. घरी कुणी नसल्याचे पाहून त्यांनी फक्त घरातून पुरस्कार चोरून नेला होता. यावर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नागराज यांनी त्या घटनेबद्दल खुलासा केला आहे.

नागराज बोलताना म्हणाले की, ‘त्यांनी पुरस्कार नेला. मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांना शोधत बसलो असतो, तर माझ्या पुढील कामावर मला लक्ष देता आले नसते. त्याचा परिणाम माझ्या आगामी प्रोजेक्टवर झाला असता. मला तसं करायचं नव्हतं. आणि तसंही त्यांनी मला मिळालेली ट्रॉफी चोरून नेली होती पण तो पुरस्कार तर कायम माझ्याच नावावर राहणार आहे. म्हणूनच मी कामावर फोकस केलं. नागराज यांनी त्या चोरांना शोधण्याचा प्रयत्न अजिबात केला नाही. परंतु, पुन्हा त्यांना पुढील चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यामुळे मला गोष्टींचा फारसा पडत नाही.’

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube