IIFA 2024: यंदाच्या आयफामध्ये जागतिक स्टार नोरा फतेही स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी सज्ज

IIFA 2024: यंदाच्या आयफामध्ये जागतिक स्टार नोरा फतेही स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी सज्ज

Nora Fatehi IIFA 2024: बॉलिवूडमध्ये (Bollywood) स्वत:चं स्थान निर्माण करणं वाटतं तितकं सोपं नाही. या इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष स्ट्रगल केल्यानंतर या क्षेत्रात त्यांचं स्थान निर्माण केलं आहे. ग्लोबल स्टार नोरा फतेही (Nora Fatehi) जिने आपल्या व्हायरल डान्स ट्रॅक आणि मूव्ह्सने मनोरंजन उद्योगात अनेकदा (IIFA Weekend 2024) सगळ्यांची मन जिंकून घेतली आहेत. आता ती आयफा स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी सज्ज आहे. ही (Nora Fatehi) अभिनेत्री सलग तिसऱ्यांदा बहुचर्चित अवॉर्ड शोमध्ये परफॉर्म करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by IIFA Awards (@iifa)


आंतरराष्ट्रीय आयकॉन IIFA वीकेंडसाठी तिचा उत्साह व्यक्त करताना सांगितले आहे की, “मला भव्य IIFA वीकेंडमध्ये परफॉर्म करताना खूप आनंद झाला आहे. गर्दीची निखळ ऊर्जा, मंत्रमुग्ध करणारी कामगिरी आणि भारतीय चित्रपटाचा उत्सव हे खरोखरच अविस्मरणीय असे वातावरण निर्माण करतात. अबू धाबी येथील यास आयलंड येथे आयफा स्टेजवर परतण्यासाठी आणि चाहते आणि सहकारी कलाकारांसोबत विलक्षण क्षण शेअर करण्यासाठी मी उत्सुक आहे. IIFA मध्ये बॅक टू बॅक परफॉर्म करण्याची ही माझी तिसरी वेळ आहे आणि IIFA वीकेंडमध्ये याचा भाग बनणे हा माझ्यासाठी विशेष सन्मान आहे ”

4 दशलक्ष पेक्षा जास्त युट्युब subscriber आणि जवळपास 47 दशलक्ष इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेली नोरा सध्या तिच्या ‘नोरा’ या हिट ट्रॅकच्या यशात आहे. ज्याने अभिनेत्री-नर्तिका-गायिका यांना जागतिक स्टार म्हणून स्थापित केले आहे. तिने फिफा विश्वचषक स्पर्धेच्या समारोप समारंभात सादरीकरण केले आणि तसेच फिफा गीत ‘लाइट द स्काय’ गायले तेव्हा या अभिनेत्रीचे जागतिक आवाहन अधोरेखित झाले. अलीकडेच मेलबर्न 2024 च्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय चित्रपट उद्योगातील एक महत्त्वाची परफॉर्मर म्हणून तिची ओळख झाली.

Nora Fatehi : नोरा फतेहीच्या बोल्ड लुकनं चाहते घायाळ

दरम्यान, नोराने 2014 मध्ये ‘रोर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने अनेक बॉलिवूडपटांमध्ये आयटम डान्स केला आहे.सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगलीये ती अभिनेत्री नोरा फतेही (Nora fatehi) हिची. नोराने तिच्या करिअरमध्ये बराच स्ट्रगल केला. एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या संघर्ष काळावर भाष्य केलं. विशेष म्हणजे त्या काळात तिने इतका त्रास सहन केला की आजही त्या आठवणी आल्या की तिच्या डोळ्यात पाणी येतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube